दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआरच्या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट बघत असतात. दरवेळी तो त्याच्या कामाने प्रेक्षकांना वेड लावतो. आता तो पुन्हा एकदा नव्या रूपात आपल्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी त्याने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली. या त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘एनटीआर-31’ असे आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील करणार आहेत. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी या चित्रपटाबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.

आणखी वाचा : जॉन अब्राहम दिसणार नव्या भूमिकेत, केली आगामी चित्रपटाची घोषणा

अलीकडेच प्रशांत नील यांनी चित्रपटाशी संबंधित माहिती शेअर केली आहे. ते म्हणाले, ‘मी गेल्या १५ ते २० वर्षांपासून एनटीआरचा चाहता आहे. स्क्रिप्टचे काम सुरू करण्यापूर्वी आम्ही १० ते १५ वेळा भेटलो आहोत. मला त्याला थोडे अधिक समजून घ्यायचे होते आणि माझ्या सर्व अभिनेत्यांबरोबर माझी अशीच प्रक्रिया असते.’ याशिवाय प्रशांत यांनी सांगितले की, हा चित्रपट २०२३च्या एप्रिलमध्ये प्रदर्शित होईल.

हेही वाचा : ‘RRR’ची ऑस्करवारी : अनुराग कश्यपचं भाकीत खरं ठरणार का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही दिवसांपूर्वी या चित्रपटात साऊथचे दिग्गज अभिनेते कमल हासन यांनी हा चित्रपट करण्याला होकार दिला आहे आणि ते या चित्रपटात दिसणार आहेत अशी चर्चा रंगली होती. त्यानंतर आता प्रशांत नील यांनी या चित्रपटासाठी कमल हासन यांच्याशी संपर्क साधल्याचे बोलले जात आहे. त्याचसोबत ज्युनियर एनटीआरच्या या नव्या चित्रपटात कमल हासन खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत, अशाही चर्चा रंगल्या आहेत. ‘आरआरआर’नंतर ज्युनियर एनटीआरची चाहत्यांमध्ये जबरदस्त क्रेझ आहे. त्यामुळे या आगामी चित्रपटात तो काय कमाल करणार याकडे त्याच्या चाहत्यांचं लक्ष लागलेलं आहे.