बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित शो ‘बिग बॉस १५’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज होणार आहे. जसा शोचा ग्रँड प्रीमिअर जवळ येत आहे, तशी शो बद्दलची उत्सुकता वाढत जात आहे. २ ऑक्टोबर रोजी या शोचा ग्रँड प्रीमियर होणार आहे. त्यामुळे हळूहळू शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची नावे समोर येत आहेत. सध्या सोशल मीडियावर ‘बिग बॉस १५’ चा नवीन प्रोमो तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांची उत्कंठा आणखीन वाढली आहे.

‘बिग बॉस १५’ च्या नवीन प्रोमोमध्ये ‘खतरों के खिलाडी १०’ ची स्पर्धक, अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि गायिका अकसा सिंग दिसत आहेत. या व्हिडीओत तेजस्वी ‘पानी पानी’ या गाण्यावर, तर अकसा तिचं ‘नागिन’ या सुपर हीट गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. अकसा सिंग ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका आहे. ‘नगीन’, ‘खिंच मेरी फोटो’ सारखी सुपर हीट गाणी तिने गायली आहेत. तसंच सलमान खान आणि कतरिना कैफ च्या ‘भारत’ या चित्रपटामधील ‘एथे आ’ हे गाणं ही तिने गायले आहे. अभिनेत्री तेजस्वी प्रकाश छोट्या पडद्यावरची अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘संस्कार-धरोहर अपना की’, ‘पेहरेदार पिया की’, ‘स्वरागिनी’ आणि ‘कर्ण संगिनी’ सारख्या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकली आहे.

दरम्यान ‘बिग बॉस ओटीटी स्पर्धक प्रतीक सेजपल ‘बिग बॉस १५’ च्या घरात एन्ट्री घेणारा पहिला स्पर्धक ठरला आहे. तसंच अभिनेत्री शमिता शेट्टी आणि निशांत भट देखील ‘बिग बॉस 15’ मध्ये सामील होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासोबतच ‘बिग बॉस 13’ चा उपविजेता असीम रियाजचा भाऊ उमर रियाज आणि डोनाल बिश्त सुद्धा ‘बिग बॉस 15’ च्या घरात सहभागी होणार आहेत. टेलिव्हिजनवरील हॅण्डसम हंक करण कुंद्रा ‘बिग बॉस १५’मध्ये सामील होणाऱ असल्याचं वृत्त आहे. आता प्रेक्षक ‘बिग बॉस १५’ सुरू होणायची आतुरतेने वाट बघत आहेत.

२ ऑक्टोबरला रात्री ९.३० वाजता ‘बिग बॉस १५’ चा प्रिमियर पार पडणार आणि सोमवारपासून म्हणजेचं ४ ऑक्टोबरपासून रात्री १०.३० वाजता कलर्सवर ‘बिग बॉस १५’चा प्रसारित होणार आहे. तर ‘विकेण्डचा वार’ ‘शनिवार हे खास एपिसोड रात्री नऊ वाजता प्रदर्शित होतील. या खास भागाचे सूत्रसंचालन सलमान खान करताना दिसेल स्पर्धकांची. तुम्ही ‘बिग बॉस १५ एक्स्ट्रा’ २४ तास वूट या ओटीटी प्लॅटफॉर्मवार बघू शकतात.