Kajol and Salman Khan Dance : सलमान खानचा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १९’ला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. दिवसेंदिवस हे भाग अधिक मनोरंजक होत आहेत. २१ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ‘वीकेंड का वार’चा एक नवीन प्रोमो रिलीज झाला आहे, ज्यामध्ये काजोल आणि जिशु सेनगुप्ता त्यांच्या ‘द ट्रायल सीझन २’ या मालिकेचे प्रमोशन करताना दिसत आहेत.

काजोल ‘सन ऑफ सरदार २’ चित्रपटातील ‘पहला तू’ या गाण्यात तिचा पती अजय देवगणच्या मजेदार डान्स स्टेप्सची खिल्ली उडवते. ती सलमान खानबरोबर गाण्याची हुक स्टेपदेखील करताना दिसत आहे.

‘वीकेंड का वार’दरम्यान, सलमान खानने काजोल आणि जिशु सेनगुप्ताचे भव्य स्वागत केले. यावेळी काजोलने रॉयल ब्लू गाऊन घातला होता. जिशुने सलमान आणि काजोलला ‘प्यार किया तो डरना क्या’मधील काही संस्मरणीय क्षण रीक्रिएट करण्याची विनंती केली. काजोल म्हणाली, “मला वाटते की, हा एक खूप खास क्षण आहे. फक्त तुझा टी-शर्ट काढ.”

काजोल आणि सलमान खानने केला डान्स

त्यांच्या संभाषणादरम्यान, सलमान काजोलला तिचा पती अजय देवगणची नक्कल करायला सांगतो. काजोल विनोदाने म्हणते, “काय १, २, ३, ४?” तिच्या उत्तराने जिशु आणि सलमान हसायला लागतात. त्यानंतर सलमान आणि काजोलने ‘प्यार किया तो डरना क्या’ चित्रपटातील ‘ओढ ली चुनारिया’ गाण्यावर डान्स केला. ट्विस्ट असा आहे की, दोन्ही स्टार गाण्यात अजय देवगणच्या ‘सिंघम’ स्टेपची नक्कल करताना दिसतात. त्यानंतर काजोल म्हणाली, “घरी हे करून पाहू नका. हे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे.”

काजोल आणि सलमान खान यांनी ‘करण अर्जुन’, ‘प्यार किया तो डरना क्या’ व ‘कुछ कुछ होता है’ असे एकत्र काम करीत तीन ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. काजोलच्या ‘ट्रायल सीझन २’ या वेब सीरिजला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. त्यात अली खान, शीबा चड्ढा, करणवीर शर्मा व कुब्बरा सैत यांच्याही भूमिका आहेत. कोर्टरूम ड्रामा ‘द ट्रायल’चा दुसरा सीझन १९ सप्टेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झाला.