छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो ‘बिग बॉस मराठी’ चा ३ सिझन सुरू झाला आहे. १९ सप्टेंबर रोजी या शोचा ग्रँड प्रीमिअर पार पडला, यात अनेक लोकप्रिय कलाकारांनी सहभाग घेतला आहे. पहिल्या दिवसापासूनच हा शो वेगवेगळ्या कारणांमुळे सतत चर्चेत आहे. सध्या सोशल मीडियावर या शोमध्ये होणाऱ्या एका टास्कचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इनस्टाग्राम अकाऊंटवर येणाऱ्या भागाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत घरातील सर्व स्पर्धकांना ‘चिऊ -ताई चिऊ-ताई दार उघड’ हे टास्क देण्यात आले आहे. या टास्कमध्ये एका राऊंडला पुरुषांना रिक्शा चालक बनून महिला स्पर्धकांना अंगणात सफर करायची आहे. या टास्क मध्ये सर्वजण सहभागी घेऊन हा टास्क यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी मेहनत घेताना दिसत आहेत. मात्र टास्कच्या दरम्यान अभिनेत्री मीरा जगन्नाथ, मीनल शाह सह अजून दोन स्पर्धकांना दुखापत झाल्याचे या व्हिडीओत पाहायला मिळते आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ तूफान व्हायरल झाला असून बिग बॉस मराठीचे चाहते या वर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका युजरने कमेंट करुन लिहिले, ‘राडा …’ , दूसरा युजर म्हणला, “सर्व स्पर्धकांचा हड्डी तोड परफॉर्मन्स”, तर तिसऱ्या युजरने “काही म्हणा पण हा टास्क खरंच खूप खतरनाक आहे मज्जा येणार आहे आजच्या एपिसोडला”, असं लिहिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बिग बॉस मराठी’च्या ३ सिझनमध्ये यंदा विशाल निकम, उत्कर्ष शिंदे, संतोष चौधरी, विकास पाटील, अविष्कार दारव्हेकर, मीरा जगन्नाथ, मीनल शाह, तृप्ती देसाई, गायत्री दातार, स्नेहा वाघ, जय दुधाने, सुरेखा कुडची, शिवलीला पाटील, सोनाली पाटील, अक्षय वाघमारे यांनी घरात प्रवेश केला आहे. हा प्रोमो पाहून या टास्क दरम्यान नेमकं काय झालं हे पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.