“बिग बॉस १५ मध्ये जो कोणी करण जोहरला प्रभावित करणार त्याला…,” अर्शी खानने केला दावा

करण जोहरला होस्ट म्हणून बघायला उत्सुक आहे ‘बिग बॉस ११’ची स्पर्धक अर्शी खान म्हणाली..

arshi-khan-karan-johar-biggboss
Photo-Arshi khan Karan Johar instagram.
कलर्सवरील लोकप्रिय आणि तितकाच विवादीत शो म्हणजे ‘बिग बॉस’. लवकरच हा शो पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यंदाच्या सीजनमध्ये बरेच बदलं होणार आहेत. ‘बिग बॉस १५’ प्रथम ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर तो टीव्हीवर प्रदर्शित होईल. या वेळेस नवीन काय आहे ?  या नवीन ‘बिग बॉस’चे सुत्रसंचालन कोण करणार? असे बरेच प्रश्न निर्माण झाले होते. निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने या प्रश्नाचं उत्तर दिली. त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर एका पोस्टद्वारे सांगितले की तो ‘बिग बॉस’ ओटीटीचं सूत्रसंचालन करणार आहे. करण ‘बिग बॉस १५’ ओटीटी होस्ट करणार हे कळताच ‘बिग बॉस’ची एक्स कन्टेस्टंट अर्शी खानने एक मोठा दावा केला आहे की ‘बिग बॉस १५’चे स्पर्धक लकी आहेत.

‘स्पॉटबॉय’ ला दिलेल्या मुलाखतीत तिने या बाबत खुलासा केला “करण जोहरला प्रेक्षकांना नक्की काय हवा आहे ते माहिती आहे, त्यामुळे त्याला हा शो होस्ट करताना पाहायला मज्जा येईल आणि हेच कारण आहे की करण जोहरचे सगळे चित्रपट हिट असतात. ‘बिग बॉस १५’चे स्पर्धक खूप लकी आहेत. जर तुम्ही करण जोहरला प्रभावित करण्यात यशस्वी झालात तर तुमची लाईफ सेट आहे. कदाचित करण तुमच्यावर खुश होऊन तुम्हाला धर्मा  प्रोडक्शनद्वारे लॉन्च करेल.”

View this post on Instagram

 

A post shared by Voot (@voot)

पुढे या नवीन फॉरमॅट बद्दलं बोलताना तिने सांगितले की “मला बघायचं आहे की घरात होणारे वाद करण कशा पद्धती  हाताळेल. करण खूप जॉली आहे, त्याला राग सूट होत नाही. त्याने त्याच्या ‘कॉफी विथ करण’या कार्यक्रमात भल्याभल्यांची  तोंडे  बंद केली आहेत. आता बघायला मज्जा येईल जेव्हा यंग सेलेब्सना त्याने केलेल्या प्रश्नांची उत्तर द्यावी लागतील. करण घरातील सदस्यांचे नखरे सांभाळू शकेल का? मला अस वाटते की या सीजनचे सदस्य आपली पायरी सांभाळून वागतील. करणला जास्त त्रास देऊ नका, कारण आधीच्या सीजनमध्ये बऱ्याच स्पर्धकांनी मर्यादा ओलांडली  होती. सलमान खानच्या सहनशक्तीचा अंत पाहिला होता. आय होप या सीजनमध्ये कोणी अस करणार नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by ARSHI KHAN AK (@arshikofficial)

दरम्यान सलमान खान ‘बिग बॉस’ होस्ट करणार का नाही ? अशी चर्चा रंगत असतानाच त्याच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. सलमान खान जरी ओटीटी व्हर्जन होस्ट करणार नसला तरी टीव्हीवर हा शो सलमान खानच होस्ट करताना दिसेल. काही दिवसांपूर्वी सलमान खानने त्याच्या इन्स्टाग्रामवर ‘बिग बॉस’ ओटीटीचा प्रोमो पोस्ट केला होता. सलमानने शेअर केलेला हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bigg boss ott ex contestant arshi khan commented that this year contestants are lucky as karan johar will be hosting this season aad

ताज्या बातम्या