‘बिग बॉस ओटीटी’ हा सर्वात वादग्रस्त आणि बहुचर्चित शो पैकी एक आहे. या शो चा महाअंतिम सोहळा काल रात्री वूट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पारपडला. या शोचे सर्व स्पर्धकांनी ६ आठवडे जिवापाड मेहनत घेतली आणि शेवटी दिव्या अग्रवाल, शमिता शेट्टी, राकेश बापट, निशांत भट्ट आणि प्रतीक सेजपाल ‘बिग बॉस ओटीटी’चे टॉप ५ च स्पर्धक ठरले. बिग बॉस ओटीटी’ च्या विजेतेपदावर अखेर दिव्या अग्रवालने आपलं नाव कोरलं आहे. तसंच रिअॅलीटी शो चा बॉस म्हणून ओळख निर्माण करणार स्पर्धक म्हणजे प्रतीक सेजपाल हा ‘बिग बॉस ओटीटी’ च्या घरातुन वॉक-आउट करणार पहिला स्पर्धक ठरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘बिग बॉस ओटीटी’ या शो मध्ये प्रतीकने त्याच्या दमदार परफॉर्मेंसमुळे प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. शो मध्ये सुरूवाती पासूनच तो चर्चित सदस्य होता. तो त्याच्या रागीट स्वभावा, दिव्या सोबत असलेली भांडणासाठी तसंच त्याची कनेक्शन नेहा भसीन सोबत झालेल्या जवळीकीमुळे त्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते आणि आता तो बिग बॉस १५ च्या घरात जाणारा पहिला स्पर्धक ठरला आहे. हो, प्रतीक सेजपाल हा बिग बॉस ओटीटी नंतर आता बिग बॉस १५च्या घरात प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसले, त्यामुळे आता प्रतीकचे फॅन्स खुप उत्सुक झाले आहेत.

बिग बॉसचा बहुचर्चित १५ वा सिझन २ ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. या शो च सूत्रसंचालन नेहमी प्रमाणे सलमान खान करताना दिसेल. तसंच ‘बिग बॉस १५’ चे प्रोमो सोशल मीडियावर चांगलेच चर्चित असून प्रेक्षक यंदाच्या थीम विषयी अंदाज लावताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss ott this contestant becomes first one to enter bigg boss 15 show aad
First published on: 19-09-2021 at 11:12 IST