Bigg Boss OTT: सिद्धार्थची आठवण आल्याने भावूक झाला करण जोहर; म्हणाला..

‘बिग बॉस ओटीटी’ने दिली दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला श्रधांजली.

sidharth
Photo-Voot

‘बिग बॉस १३’ चा विजेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीला खुप मोठा धक्का बसला आहे. सिद्धार्थ शुक्ला हा ‘बिग बॉस’ शोचा अविभाज्य भाग होता. तो ‘बिग बॉस’ १४ आणि ‘बिग बॉस ओटीटी’ दोन्ही सिझनमध्ये येऊन स्पर्धकांना प्रोत्साहन द्यायचा. असा सतत हसणारा स्वत:च्या मतांवर ठामपणे उभा राहणारा चेहरा काळाच्या पडद्याआड गेला. रविवारी ‘बिग बॉस ओटीटी’ने सिद्धार्थ शुक्लाला श्रद्धांजली अर्पण करत बिग बॉसमधील त्याने व्यतीत केलेल्या क्षणाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

सिद्धार्थचा हा व्हिडिओ ‘बिग बॉस ओटीटी’च्या रविवारच्या एपिसोडच्या सुरूवातीला दाखवण्यात आला होता. यावेळी शोचा होस्ट करण जोहर सिद्धार्थ शुक्ला बद्दल बोलताना भावूक झाला. तो म्हणाला तो सिद्धार्थ बद्दल बोलताना म्हणाला “मला अजून विश्वास बसत नाही की सिद्धार्थ जो बिग बॉस फॅमिलीचा लाडका स्पर्धक होता…एक असा चेहरा, एक असं नावं जो आपल्या आयुष्यातला महत्वाचा भाग झाला होता. तो आज आपल्या सोबत नाही. सिद्धार्थ फक्त माझा नव्हे तर इंडस्ट्रीमधील अर्ध्या अधिक लोकांचा मित्र होता. सिद्धार्थवर त्याचे फॅन्स खुप प्रेम करायचे आणि हीच त्याच्या लोकप्रियतेची पावती आहे. सिद्धार्थ शुक्ला तुझी आठवण नेहमीच येईल.” करण म्हणला की प्रेक्षकांना आणि मला शो पुढे नेण्यासाठी ताकदीची गरज आहे. “आज सिद्धार्थ शुक्ला असता तर त्यानेही हेच म्हंटले असते की शो मस्ट गो ऑन म्हणून आपण आजच्या भागाला सुरवात करुयात,”असे म्हणत करणने भागाची सुरूवात केली.

सिद्धार्थ शुक्लाने २०१४ मध्ये ‘हम्टी शर्मा की दुल्हनिया’ या करण जोहर निर्मित चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तसंच मागच्या आठवड्यात सिद्धार्थ शुक्ला ‘बिग बॉस ओटीटी’ मध्ये शेहनाज गिल सोबत गेस्ट म्हणून आला होता. सिद्धार्थ शुक्लाचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाले अशी माहिती समोर आली आहे. करणचा हा व्हिडिओ पाहुन नेटकरी देखील भावुक झालेले दिसले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Biggboss ott host karan johar gets emotional while paying tribute to late actor sidharth shukla aad