बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासू तिच्या सौंदर्याबरोबरच अभिनयासाठीही ओळखली जाते. बिपाशा नेहमीच तंदुरुस्त असते. मात्र, मुलीच्या जन्मानंतर तिचे वजन वाढले आहे.
बिपाशा नुकतीच जिमच्या बाहेर दिसली, जिथे तिचे वजन खूप वाढलेले दिसून आले. त्यानंतर तिला खूप ट्रोल करण्यात आले. आता बिपाशाने तिला ट्रोल करणाऱ्यांना चोख उत्तर दिले आहे. मुलगी देवीच्या जन्मानंतर बिपाशाचा लूक पूर्णपणे बदलला आहे. तिच्या शरीरात अनेक बदल झाले आहेत. ती स्वतःला पूर्वीसारखे बनवण्याचा प्रयत्नही करत आहे.
ट्रोलर्सना बिपाशाचे उत्तर
मिस इंडिया श्वेता विजय नायरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये बिपाशाची तिच्या जास्त वजनाची खिल्ली उडवण्यात आली आहे. यावर श्वेताने म्हटले आहे की, मुलाच्या जन्मानंतर महिलांच्या आयुष्यात आणि शरीरात अनेक बदल होतात. पण, समाज अजूनही ते स्वीकारत नाही.’ श्वेताच्या या पोस्टवर बिपाशाने कमेंट केली आहे. तिने लिहिले आहे, “मी ती आत्मविश्वासू महिला आहे, जिचा जोडीदार आणि कुटुंब तिला पाठिंबा देते. तिला ट्रोल आणि मीम्सचा फरक पडत नाही. माझ्या जागी दुसरी महिला या दुष्टपणाने खूप प्रभावित आणि घायाळ होऊ शकते. समाज महिलांना कमी लेखतो. महिलांनी पुढे जाण्यासाठी आवाज उठवला पाहिजे आणि त्यांचे कौतुक केले पाहिजे.”
बिपाशाचे समर्थन करताना तिचा पती करणनेही कमेंट केली. त्याने लिहिले, ‘स्त्रिया देवी आहेत, ज्यांची पूजा केली पाहिजे. त्यांच्यासारखे जीवन कोणीही देऊ शकत नाही, त्या देव आहेत.’ बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर यांचे लग्न २०१६ मध्ये झाले होते. या जोडप्याला एक मुलगीदेखील आहे. बिपाशाने २०२२ मध्ये एका मुलीला जन्म दिला.
बिपाशाने वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. दोन दशकांच्या कारकिर्दीत बिपाशाने अनेक चित्रपट केले, ज्यात तिच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. बिपाशाने २००१ मध्ये ‘अजनबी’ या थ्रिलर चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. यानंतर तिने सुपरहिट हॉरर फिल्म ‘राज’ (२००२) मध्ये काम केले. हा चित्रपट तिच्या करिअरमधील टर्निंग पॉइंट ठरला. आजही बिपाशाला हॉरर चित्रपटांसाठी पहिली पसंती आहे.