दिल्ली मेट्रोमधील व्हिडीओ खूप चर्चेत असतात. अनेकदा मेट्रोत भांडणं व हाणामारी झाल्याचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता अभिनेत्री बॉबी डार्लिंगचा दिल्ली मेट्रोतील एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती एका तरुणाला मारताना दिसत आहे. बिग बॉसच्या पहिल्या सीझनमध्ये झळकलेली बॉलिवूड अभिनेत्री बॉबी डार्लिंग या व्हिडीओमध्ये दिल्ली मेट्रोमध्ये एका व्यक्तीशी भांडताना दिसत आहे. एवढेच नाही तर दोघांमध्ये जोरदार भांडण आणि शिवीगाळ होते.

“कोणाच्या बापाची हिंमत नाही की…”, अक्षय कुमार स्पष्टच बोलला; म्हणाला, “सगळे मला…”

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ती पुरुष प्रवाशाशी गैरवर्तन करताना दिसत आहे. दोघांचं भांडण वाढल्यानंतर एक सीआयएसएफ हे भांडण थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. व्हिडीओमध्ये बॉबी डार्लिंगच्या हातात एक पांढरी बॅग असल्याचे दिसत आहे. तो प्रवाशी ती बॅग ओढण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर दोघांचे जोरदार भांडण होते. या भांडणात अभिनेत्री पुरुष प्रवाशाला शिवीगाळ करताना आणि मारहाण करताना दिसत आहे. तो प्रवाशी तिला दुसरीकडे बसायला सांगतो पण ती शिवीगाळ करतच राहते. त्यानंतर सीआयएसएफ जवान मध्यस्थी करून भांडण थांबवण्याचा प्रयत्न करतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यावर नेटकरी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी मेट्रोमध्ये प्रवास करणं अवघड झालं आहे, असं म्हटलं आहे. तर काहींनी दिल्ली मेट्रो मनोरंजनाचं साधन झालं आहे, अशा कमेंट्स केल्या आहेत.