अहान पांडे आणि अनित पड्डा स्टारर ‘सैयारा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. जगभरात या चित्रपटाने ५०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. त्याचबरोबर भारतातही या चित्रपटाने ३०० कोटींहून अधिक कमाई केली आहे आणि त्याची कमाई अजूनही सुरूच आहे.
अशा परिस्थितीत आता बॉबी देओलने सांगितले की, तो अहान पांडेच्या दमदार सुरुवातीमुळे खूप आनंदी आहे. त्याने असेही सांगितले की, जेव्हा अभिनेत्याने चित्रपटाच्या प्रदर्शन प्रसंगी हा चित्रपट पाहिला तेव्हा तो आपले अश्रू रोखू शकला नाही. बॉबीला अहानचे बालपणही आठवले.
‘हिंदुस्थान टाईम्स’च्या वृत्तानुसार, ‘अॅनिमल’फेम अभिनेत्याने सांगितले की, त्याला ‘सैयारा’ खूप आवडला. तो खूप आनंदी होता. कारण- अहान त्याच्यासमोर मोठा झाला आहे. त्याला ते दिवस आठवले जेव्हा अहान लहान होता आणि स्पायडरमॅनचा पोशाख घालून, तो पंचिंग बॅगवर पंचिंग करायचा. बॉबी म्हणतो की, तो सुरुवातीपासूनच खूप उत्साही आहे.
अहानने ८ वर्षे वाट पाहिली : बॉबी देओल
बॉबी देओलच्या मते, अहान पांडेच्या पदार्पणाबद्दल त्याला असे वाटले की, जणू त्याच्या मुलाने चित्रपटसृष्टीत पहिले पाऊल टाकले आहे. अभिनेता म्हणतो की, अहानने ‘सैयारा’च्या प्रदर्शनासाठी ८ वर्षे वाट पाहिली. ‘अॅनिमल’ चित्रपटातील अभिनेत्याने अहानला हा चित्रपट कसा मिळाला ते सांगितले. त्याने सांगितले की, त्यामागे एक अद्भुत कथा आहे. तो खूप आनंदी होता. बॉबीने सांगितले की, तो हा चित्रपट पाहताना खूप रडला होता.
बॉबी देओलकडून मोहित सुरीचे कौतुक
बॉबी देओल म्हणाला की, मोहित सुरीने खूप छान काम केले आहे. त्याने कलाकारांच्या भूमिकांचेही कौतुक केले. अहान आणि अनितला पाहणे त्याच्यासाठी मनोरंजक होते. बॉबी म्हणतो की, मोहितने पटकथा उत्तम प्रकारे रंगवली आहे. अभिनेत्याने चित्रपटाची कथा, संगीत आदी सर्व गोष्टींचे कौतुक केले.
मात्र, ‘सैयारा’च्या यशानंतर चाहते अहान पांडे आणि अनित पड्डा यांच्या नवीन चित्रपटाच्या घोषणेची वाट पाहत आहेत. कारण- दोघांनीही हिंदी चित्रपटसृष्टीत चांगली सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत ही जोडी इतर कोणत्या चित्रपटांमध्ये दिसणार आणि त्यांचे कोणते एकल चित्रपट प्रदर्शित होतील, तसेच ते पुढे पडद्यावर कसे काम करतील हे पाहणे मनोरंजक ठरेल.