कॅमेऱ्यासमोर कलाकार मंडळींना राग अनावर होणं ही काही नवी गोष्ट राहिलेली नाही. कलाकारांना राग अनावर झाला आणि त्याच घटनेचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसले. सलमान खान, जॉन अब्राहम, कपिल शर्मा यांसारख्या कित्येक मंडळींचा कॅमेऱ्यासमोर राग अनावर झाला. त्याची बी-टाऊनमध्ये बरीच चर्चा रंगली. आता अर्जुन कपूरच्या (Arjun Kapoor) बाबतीत देखील असंच घडलं आहे.

आणखी वाचा – रणबीर कपूरची जादू फिकी, अवाढव्य खर्च, जबरदस्त प्रमोशन करूनही ‘शमशेरा’ला थंड प्रतिसाद

सेलिब्रिटी छायाचित्रकार विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे अर्जुनचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये पापाराझी छायाचित्रकारांशी मोठ्या आवाजात बोलताना अर्जुन दिसत आहे. मुंबईमधीलच अर्जुनचा हा व्हिडीओ आहे. कामासाठी अर्जुन बाहेर आला असता पापाराझी छायाचित्रकारांनी फोटोसाठी रस्त्यावरच अर्जुनला घेरलं. ते पाहून त्याचा राग अनावर झाला असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

रागामध्ये अर्जुन पापाराझी छायाचित्रकारांना रस्त्यावरुन थोडं बाजूला होण्याचा सल्ला देतो. त्यादरम्यान अर्जुन म्हणतो, “तुम्ही आधी रस्त्यावरून बाजूला व्हा. तुम्ही इथे रस्त्यावर गर्दी करता आणि नाव आमचं खराब होतं. असं कधीच करू नका. तुमच्या अशा वागण्यामुळे कोणाला तरी दुखापत होऊ शकते.” अर्जुनच्या या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

आणखी वाचा – VIDEO : ‘आई कुठे काय करते’मधील अनिरुद्धची खरी लेक ‘या’ क्षेत्रात करते काम, अभिनेता म्हणतो, “वडील म्हणून मला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“तू अगदी योग्य केलंस” असं अनेक जणांनी कमेंटच्या माध्यमातून म्हटलं आहे. या व्हिडीओमध्ये अर्जुनने लाल रंगाचं शर्ट आणि पँट परिधान केलेली दिसत आहे. अर्जुन सध्या त्याच्या ‘एक विलन रिटर्न्स’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. त्याचा हा चित्रपट लवकरच बॉक्स ऑफिसवर दाखल होईल.