scorecardresearch

मुंबईचा पाऊस पाहून बोमन इराणींना आठवली मराठी कविता, पाहा व्हिडीओ

बोमन इराणी यांनी देखील पावसाचा आनंद लुटला आहे.

boman irani
बोमन इराणी

बॉलिवूडमध्ये आजवर अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यातील एक नाव म्हणजे अभिनेता बोमन इराणी. हरहुन्नरीने अभिनय करणारे बोमन इराणी हे आजही तितकेच प्रसिद्ध आहेत. बोमन इराणी यांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांना भुरळ पडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईकर सुखावले आहेत. बोमन इराणी यांनी देखील पावसाचा आनंद लुटला आहे. त्याचा एक व्हिडीओदेखील त्यांनी शेअर केला आहे.

बोमन इराणी हे गेल्या कित्येक वर्षापासून दादरच्या पारशी कॉलनीन राहतात. ते इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असतात. बोमन इराणी यांनी मुंबईतील पावसाचा आनंद घेतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांनी त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळाही दिला आहे. ‘हा पाऊस बघून मला माझं बालपण आठवलं. आम्ही लहानपणी असेच शाळेत जायचो. हा माझा घरचा परिसर आहे, जिथे आता सध्या पाणी साचलं आहे.’ असं म्हणत बोमन इराणी यांनी त्यांच्या घराच्या आजूबाजूचा परिसर दाखवला.

“आता ‘राजी-नामा’ देतोय…”, अभिजित पानसे यांची ‘ती’ पोस्ट चर्चेत

त्यासोबत त्यांनी त्यांच्या इमारतीतील सुरक्षारक्षकाची ओळखही करुन दिली. यावेळी ते त्याच्याशी चक्क मराठीतून संवाद साधताना दिसले. त्यावेळी ते ‘हो मी लवकर आलो’ असं ते वॉचमनला सांगताना दिसत आहेत. त्यानंतर बोमन इराणी चक्क मराठीत कविता म्हणत पावसाचा आनंद लुटताना दिसत आहेत. बोमन इराणी यांनी चक्क ‘ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा’ ही कविता म्हटली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांप्रमाणे अनेक सेलिब्रेटीही पावसाची मजा घेताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ –

प्रियांकाने अमेरिकेत सुरु केला नवा व्यवसाय, एका कप-बशीची किंमत पाहून तुम्हीही व्हाल अवाक्!

बोमन इराणी यांचं मुंबईशी घट्ट नातं आहे. ते जन्मत: मुंबईकर असल्याने त्यांना उत्तम मराठी सुद्धा बोलता येतं. सध्या बोमन इराणी यांचा ‘मासूम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. यात त्यांच्या अभिनयाचे आणि भूमिकेचं खूप कौतुक होताना दिसत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bollywood actor boman irani enjoying mumbai rain sing marathi song video viral nrp

ताज्या बातम्या