तब्बल ११ वर्षांनंतर फरदीन खानचं पुनरागमन; या चित्रपटात करणार काम

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता अक्षय कुमार सोबत फरदीन खानने केले होते काम.

fardeen-khan
(Photo-Indian Express)

‘ओम जय जगदीश’ ‘हे बेबी’, ‘कुछ तुम कहो कुछ हम’, ‘नो एंट्री’ सारख्या अनेक सुपर हिट सिनेमातून प्रेक्षकांचे मन जिंकणारा अभिनता म्हणजे फरदीन खान. फरदीन खान हा दिवंगत आभिनेता फिरोज खान यांचा मुलगा आहे.  फरदीनने ‘दुल्हा मिल गया’ या चित्रपटात नंतर कोणत्या ही चित्रपटात काम केलं नाही. आणि आता तब्बल ११ वर्षांनी तो या इंडस्ट्रीत पुरनरागमन करत आहे.

फरदीन खानला त्याच्या कॉमेडी टाइमिंगसाठी चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. मात्र तो अभिनयासोडून इतर प्रकरणांमध्ये अडकल्यामुळे त्याचे करिअर खालावले. अंमली पदार्थांच्या आहारी जाणं आणि वादात अडकून पडणं हे त्याच्या अपयशाचे कारण ठरले, असे म्हटलं जाते. मात्र आता पुन्हा तो ११ वर्षांनी प्रेक्षकांसमोर येणार आहे. फरदीन आणि रितेश देशमुख ‘हे बेबी’ नंतर पुन्हा एकत्र काम करणार आहेत. रितेश देशमुखचा ‘विस्फोट’ या आगामी चित्रपटात फरदीन महत्वाची भूमिका साकारताना दिसेल. ‘विस्फोट’, हा २०१२ सालचा ऑस्कर नामांकित चित्रपट ‘रॉक पेपर सिझर’ या चित्रपटाचा रिमेक आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

रितेश आणि फरदीन तब्बल १४ वर्षांनी पुन्हा एकत्र काम करणार आहेत, या बाबत बोलताना चित्रपटाचे दिग्दर्शक सांजय गुप्ता म्हणाले, “फरदीन आणि रितेश सोबत काम करायला मी खुप खुश आहे. हे प्रोजेक्ट माझ्यासाठी खुप खास आहे, मी आणि माझी संपुर्ण टिम या प्रोजेक्टवर प्रचंड मेहनत घेत आहोत. माला सांगायला आतिशय आनंद होत आहे की ,महिन्या आखेर या चित्रपटाच्या प्राॅडक्शनचे काम सुरु करण्यात येईल.” ‘विस्फोट’ या चित्रपटाचे कथानक थरारक असून रितेश आणि फरदीन एकमेकांच्या विरोधात लढताना दिसतील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bollywood actor fardeen khan all set for his comeback after 11 years gap aad

ताज्या बातम्या