बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनया बरोबरच अॅक्शन सिन आणि एक उत्तम डान्सर म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे टायगर श्राॅफ. टायगर हा त्याच्या फॅमिलीशी खूप क्लोज आहे. अलिकडेच टायगरने त्याच्या आई-वाडिलांसाठी नवीन आलिशान घर घेतलं असून हे घर का घेतलं? याबाबतचा वडील जॅकी श्रॉफ यांनी मोठा खुलासा केला आहे.
टायगरने आई आयेशा आणि वडील जॅकी श्रॉफ यांच्यासाठी आठ बिएचकेचा आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. हा आलिशान फ्लॅट बघून संपूर्ण परिवार खुश असून ते त्या घरी शिफ्टसुद्धा झाले आहेत. एका मुलाखतीत वडील जॅकी यांनी हे नवीन घर घेण्यामागचे खरे कारण सांगताना ते म्हणाले “मुलाने आईसाठी काहीही केलं तरी ते खास असतं टायगरच्या बाबतीत पण असंच होतं…त्याला सुद्धा त्याच्या आईसाठी काहीतरी अद्भुत करायचे होते. टायगरचं स्वप्न होतं की तो त्याच्या आईसाठी एक आलिशान घर विकत घेईल आणि तो यासाठीच दिवसरात्र मेहनत करायचा.”
View this post on Instagram
आपल्या मुलाच्या स्वभावा बद्दल बोलताना वडील जॅकी श्रॉफ पुढे म्हणाले, ” टायगर खूप भावुक आणि गोड असा आहे. मी नेहमीच कामासाठी बाहेर असायचो या वेळेस या वाघाचे संगोपन आई आयेशा आणि त्याच्या दोन आज्यांनी केलं आणि म्हणून तो त्यांच्याशी खूप क्लोज आहे.” आपल्या मुलाच्या नवीन घरात जास्त वेळ घालवायला सुरुवात केली असल्याचे ही जॅकी यांनी त्या मुलाखतीत सांगितले आहे. जॅकी श्राॅफ यांचा ‘द इंटरव्यू: नाईट ऑफ 26/11’ हा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यामध्ये त्यांनी युद्ध पत्रकाराची भूमिका साकारली असून हा चित्रपट डच चित्रपट ‘द इंटरव्ह्यू’ चा रिमेक आहे. याआधी त्यांनी प्रभुदेवाच्या ‘राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. जॅकी श्रॉफ यांना अभिनय विश्वात करिअर घडवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला असून ते 33 वर्षे चाळीत राहिले होते. अशात टायगरची ही खास भेट त्यांच्यासाठी अजून खास झाली.