बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन इंडस्ट्रीतील आघाडीच्या कलाकारांपैकी एक मानला जातो. ‘प्यार का पंचनामा’ चित्रपटातून कार्तिकला खरी ओळख मिळाली. पण त्याच्या कामाबरोबरच त्याचं नाव अनेकदा त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिलं. कार्तिकचं नाव आतापर्यंत बऱ्याच अभिनेत्रींशी जोडलं गेलं आहे. त्यातही सैफ अली खानची मुलगी सारा अली खानशी त्याचं अफेअर बरंच गाजलं होतं. नुकताच त्यांने फोटो शेअर केला आहे.
कार्तिक आर्यन सोशल मीडियावर सक्रीय असतो. त्याने नुकताच एक सेल्फी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यावर त्याने हटके कॅप्शन दिला आहे की “मी माझ्या व्यायामशाळेबरोबर कधीच ब्रेकअप करणार नाही, मी कायमच वर्क आउट करतो,”अशा शब्दात त्याने कॅप्शन लिहला आहे. त्याच्या या कॅप्शनने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.
कार्तिक आर्यनचा नुकताच ‘फ्रेडी’ चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कार्तिकबरोबर अभिनेत्री अलाया एफ मुख्य भूमिकेत आहे. डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं समीक्षकांनी बरंच कौतुक केलं आहे. आगामी काळातही त्याचे बरेच चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत आणि या वर्षभरात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे.