बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता आर माधव सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते आहे. तो नेहमीच त्याच्या चाहत्यांशी संपर्कात असतो. त्याने केलेली प्रत्येक पोस्ट इंटरेस्टिंग असतात. माधवने नुकतीच त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत एक मजेशीर मात्र तितकाच धक्कादायक किस्सा नेटकऱ्यांना सांगितला आहे.
आर माधवन ‘अमेरिकी पंडीत’ त्याच्या आगामी चित्रपटासाठी तो दुबईला जात होता त्यावेळेस त्याने त्या प्रवासाचे चित्रीकरण केले आहे. त्याने हे व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हा किस्सा तो दुबईला जात असताना त्याच्यासोबत घडला होता. यातील एका व्हिडीओत माधवन विमानातील रिकाम्या खुर्च्या दाखवत आहे, तर दुसऱ्या व्हिडीओत विमानतळावर फक्त तो एकटा असल्याच कळतं आहे. तर अजून एका व्हिडीओत विमानतळाच्या लाऊंजमध्ये तो एकटा असल्याचे पाहिला मिळत आहे. करोना महामारीमुळे दुबईला येण्या जाण्यावर काही बंधन आहेत. ज्यांचे कोविड रिपोर्ट निगेटीव्ह आहेत तेच प्रवास करू शकतात. मात्र त्यांना ते रिपोर्ट त्यांच्याबरोबर ठेवावे लागतील. हा व्हिडीओ शेअर करत माधवनने कॅप्शन दिले की, “ही परिस्थिती लवकर संपुष्टात यावी यासाठी, मनापासून प्रार्थना करतो आहे. जेणेकरून लोक एकमेकांसोबत पुन्हा एकत्र येतील. २६ जुलै २०२१…मजेशीर मात्र तितकाच धक्कादायक किस्सा. #अमेरिकनपंडीत दुबईत शूट”.
View this post on Instagram
आर माधवनने शेअर केलेले हे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. त्याने शेअर केलेला मजेशीर किस्यावर नेटकरी कमेंट्स करून त्यांची मतं मांडताना दिसत आहेत. आर माधवन शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकताच त्याने ‘डिकपलदं’ या नेटफ्लिक्स सीरिजचा पहिला सिझनचं शूटिंगपूर्ण केले असल्याची घोषणा त्याच्या इन्स्टाग्रामवार केली होती. तसंच अॅमेझोन प्राइमवरील ‘ब्रीथ’ नावाची वेब सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आर माधवन ‘३ इडियट्स’, ‘तनू वेड्स मनू’ अश्या बऱ्याच चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकला आहे.