रणवीर सिंह सध्या आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. हा चित्रपट जाहीर झाल्यापासूनच चर्चेत आहे. आता सोशल मीडियावर या अभिनेत्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याचे जबरदस्त ट्रान्स्फॉर्मेशन पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

रणवीर एका रफ अँड टफ लूकमध्ये दिसत आहे. त्यामध्ये रणवीर पूर्णपणे नवीन अवतारात दिसत आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. हा व्हिडीओ फिल्मफेअरने त्यांच्या इन्स्टा पेजवर शेअर केला आहे. रणबीर वाढलेल्या दाढी आणि लांब केसांसह रस्त्यावर मोकळेपणाने फिरत आहे.

व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी त्यावर मजेदार कमेंट्स करायला सुरुवात केली. एका वापरकर्त्याने लिहिले- ब्लॉकबस्टर लोडिंग. दुसऱ्याने लिहिले- लवकरच एक ब्लॉकबस्टर चित्रपट येत आहे. संजय दत्त, यामी गौतम, अक्षय खन्ना, आर. माधवन व अर्जुन रामपाल यांसारखे कलाकार ‘धुरंधर’मध्ये रणवीरबरोबर दिसतील.

तसेच, ‘छावा’मध्ये औरंगजेबाची भूमिका साकारल्यानंतर अक्षय खन्ना पुन्हा एकदा आदित्य धरच्या आगामी अ‍ॅक्शन थ्रिलर ‘धुरंधर’मध्ये खलनायकाची भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. रणवीरची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट एका धाडसी बचाव मोहिमेवर आधारित आहे.

नुकताच अक्षय खन्नाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये तो पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ डोंबिवलीमधील मोठा गाव-माणकोली पूलवरचा आहे. ‘धुरंधर’ चित्रपटाच्या शूटिंगमुळे २३ ते २४ मे या दिवशी हा रस्ता बंद करण्यात येणार आहे.

इंडिया टुडेमधील एका वृत्तानुसार, रणवीरच्या बहुप्रतीक्षित ‘धुरंधर’ चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईतील मढ आयलंडमध्ये पूर्ण झाले आहे. आता कलाकार आणि क्रू अमृतसरमध्ये चित्रीकरणाच्या पुढील टप्प्याची तयारी करीत आहेत. हा चित्रपट उत्तम अ‍ॅक्शन, ड्रामा व सस्पेन्ससह एक उच्च ऑक्टेन ड्रामा असेल याची खात्री आहे.

View this post on Instagram

A post shared by Filmfare (@filmfare)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘धुरंधर’ हा चित्रपट केवळ रणवीरच्या अभिनयामुळे नव्हे, तर त्याच्या अंगभूत रूपांतर क्षमतेमुळेही चर्चेचा विषय ठरत आहे. विविध रूपांत प्रेक्षकांसमोर येणाऱ्या रणवीरकडून धडाकेबाज परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे आणि तो नक्कीच रोचक ठरणार आहे.