सारा अली खानला झाली दुखापत; आई-वडिलांची माफी मागतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सारा अली खानला झालेल्या दुखापतीमुळे, तिला वडील सैफ अली खान आणि आई अमृता सिंगची माफी मागावी लागली आहे.

sara-ali-khan
(Photo-Loksatta File)

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही नेहमीच चर्चेत असते. अभिनयासह सारा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. ती सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. तिने शेअर केलेल्या प्रत्येक फोटो, व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती देखील मिळताना दिसते. तर, आताही साराने नुकताच शेअर केलेल्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला आहे. यात ती तिच्या आई आणि वडिलांची माफी मागताना दिसत आहे.

साराने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ खाली तिने “आई बाबा मी तुमचं नाक कापलं” असं कॅप्शन दिले आहे.  साराने असं कॅप्शन दिले असले तरी याला सिरीयसली घेऊ नका. कारण तिने तिच्या आई वडिलांचे नाक कापलं नसून तिच्या नाकाला दुखापत झाली आहे. या व्हिडीओत तिला झालेल्या दुखापती बद्दल ती सांगताना दिसत आहे. ती या व्हिडीओत, “नोक नोक कोण आहे, नोक आहे. कोण नोक…नोक आउट.” असं म्हणताना दिसत आहे. साराने पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याचे ही या व्हिडीओत दिसून आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

कामाच्या बाबत बोलायचे झाले तर सध्या अभिनेता अक्षय कुमार आणि साऊथ सुपरस्टार धनुष सोबत ‘अतरंगी रे’या चित्रपटावर काम करता आहे. आनंद एल राय दिग्दर्शत या चित्रपटाचं शुटिंग मागच्यावर्षी सुरू होणार होतं. मात्र करोना माहामरीमुळे याची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आता पुन्हा या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करण्यात आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bollywood actor sara ali khan says sorry to her mom amrita singh and saif ali khan for this reason video went viral aad