बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता ही नेहमीच तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून ती ‘आश्रम ३’ वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती अनेकदा तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. नुकतंच तिने तिचे काही बोल्ड लूकमधील फोटो शेअर केली आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

‘जन्नत २’, ‘राज थ्री डी’, ‘चक्रव्यूह’, ‘बेबी’, ‘रुस्तम’, ‘टोटल धमाल’ यांसारख्या चित्रपटातील बोल्ड भूमिकांमुळे ईशा गुप्ता ही कायमच चर्चेत असते. ईशा गुप्ताने नुकतंच ट्वीटरवर दोन बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत यात काही तासांपूर्वी शेअर केलेल्या फोटोत ईशा गुप्ताने पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. तिच्या या ब्रालेस फोटोंमुळे अनेकांनी तिला ट्रोल केले आहे.

तिच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट करत म्हटलं की, ‘तुमचं वय कितीही वाढू द्या, सवय काही जात नाही. ग्लॅमरस राहणे गरजेचे असते’. ‘हे फार वाईट आहे. तुम्ही तरुणांना काय सल्ला देऊ इच्छिता’, असा प्रश्न एकाने कमेंट करत तिला विचारला आहे. तर एकाने कमेंट करत म्हटलं की ‘जेव्हा तुमच्या अभिनयात कोणतीही ताकद नसते तेव्हा तुम्हाला या गोष्टींमधून जावे लागते. ‘

तर दुसऱ्या फोटोत ती काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे. यावेळी तिने बेडवर बोल्ड पोज दिली आहे. या फोटोमुळेही तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. तिच्या या फोटोवरही नेटकऱ्यांनी विविध कमेंट करत तिला ट्रोल केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान काही दिवसांपूर्वी ईशाने बोल्डनेस आणि त्यावरुन होणारे ट्रोलिंग याबद्दल एक वक्तव्य केले होते. “आपल्या देशात हीच समस्या आहे ती स्त्रियांना नेहमीच जज केलं जातं. त्यांच्यासोबत गैरवर्तन केलं गेलं तर त्यांनाच ‘तू तिथे गेलीसच का?’ असा प्रतिप्रश्न केला जातो. जर पुरुषांनी शरीर दाखवलं, शर्टलेस फोटो शेअर केले तर त्यांना कुणीच काही बोलत नाही पण जर स्त्रियांनी असं केलं तर मात्र त्यांच्यावर टीका केली जाते. मला वाटतं याबाबत आपल्या देशातील लोकांचे विचार बदलणं गरजेचं आहे. आपल्या देशात नेहमीच स्त्री आणि पुरुषांमध्ये भेदभाव केला जातो. पण प्रत्येकाला त्याच्या इच्छेप्रमाणे जगण्याचा हक्क असायला हवा.” असे तिने यात म्हटले होते.