बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासा देवगण ही कायमच चर्चेत असते. ती अनेकदा तिचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करताना दिसते. नुकत्याच या मायलेकी मुंबईतील प्रसिद्ध अशा सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. या दोघींचा व्हिडीओ होत आहे. नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा तिला ट्रोल केलं आहे.

बॉलिवूडचे स्टार कीड्स सातत्याने माध्यमांच्या चर्चेत येत असतात. न्यासा बऱ्याचदा तिच्या कपड्यांवरून ट्रोल होताना दिसून येते. सिद्धिविनायक मंदिरात जाताना तिने पांढरी सलवार सूट परिधान केला होता. इतरवेळी शॉर्ट ड्रेस परिधान करणारी न्यासा मंदिरात मात्र नेटनेटक्या कपड्यात जाताना दिसली. एकाने लिहले आहे “अरे ही तर न्यासा आहे पूर्ण कपड्यात ओळखू आली नाही.” तर दुसऱ्याने लिहले आहे “६ दिवस पार्टी करायची आणि मग १ दिवस देवदर्शन चांगला संकल्प आहे” असा टोला त्याने लगावला आहे.

सई ताम्हणकरची ‘पालीशी’ तुलना; नव्या फोटोशूटवरून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

एकाने लिहले आहे हीच पार्टीतला लूक बघा आणि हा बघा २ किलो मेकअप कमी झाला वाटत. आणखीन एकाने लिहले आहे “ही तर नशेत वाटत आहे.” मात्र काही जणांनी तिची बाजू घेतली आहे. “ती मंदिरात गेली आहे त्यावरून इतकं ट्रोल करू नका.” असा सल्ला एकाने दिला आहे.

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्यासाच्या बॉलिवूड पदार्पणाबाबतही खूप चर्चा होत असतात. पण ती सध्या स्वित्झर्लंडमधील ग्लिओन इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशनमध्ये इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटीचा अभ्यास करत आहे. इतक्यात तरी तिचा बॉलिवूडमध्ये यायचा कोणताही विचार नसल्याचं अनेकदा काजल आणि अजयने स्पष्ट केलंय. दरम्यान काजोल नुकतीच ‘सलाम वेंकी’ या चित्रपटात दिसली होती.