संपूर्ण देशात आज मोठ्या उत्साहने रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. या दिवशी बहीण तिच्या भावाला राखी बांधून त्यांच्यात असलेलं नात आणखीन घट्ट करते. तसेच त्याला दीर्घ आयुष्य आणि सुख लाभू दे यासाठी प्रार्थना करते. तर त्याचवेळी भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. बॉलिवूडची धक धक गर्ल म्हणून ओळखली जाणारी आभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित. माधुरीने भावाला ओवाळत असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
माधुरीने अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडाओत त्यांच्यात असलेलं बहिण भावाचे घट्ट नात दिसून येत आहे. तिने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओसोबत तिने सुंदर बहिण-भावाचं गाण लावलं आहे. माधुरीने राखाडी रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला आहे. तर तिच्या भावाने निळ्या रंगाचा फॉर्मल शर्ट आणि पॅन्ट परिधान केला आहे. माधुरी यात तिच्या भावाचे औक्षण करताना दिसत आहे. औक्षण केल्यानंतर माधुरी आणि तिच्या भावाने एकमेकांना मिठी मारली. हा व्हिडीओ शेअर करत तिने कॅप्शन मध्ये सगळ्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
माधुरी दीक्षितने शेअर केलेला हा व्हिडीओवर चाहते लाइक्स आणि कमेंट करुन त्याच्या भावना व्यक्त करत आहेत. याआधी देखील माधुरीने तिच्या नवीन लूकमध्ये फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यात ती अतिशय सुंदर दिसत होती. माधुरीच्या या फोटोंनी अनेकांची मने जिंकली होती. सोशल मीडियावर त्या फोटोंनी धुमाकूळ घातला होता. तिच्या चाहत्यांनी त्याच्यावर कमेंटचा वर्षाव देखील केला होता.