scorecardresearch

“बॉलिवूडमध्ये चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये दिग्दर्शकाच्या गर्लफ्रेंडला कास्ट करतात!”

मल्लिका शेरावतने एका मुलाखतीत सांगितलं..

“बॉलिवूडमध्ये चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये दिग्दर्शकाच्या गर्लफ्रेंडला कास्ट करतात!”
(Photo-Instagram)

‘वेलकम’ हा बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटतील प्रत्येक पत्राला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळाले असून अजूनही हा चित्रपट तितक्याच आवडीने पहिला जातो. या चित्रपटात अभिनेत्री मल्लिका शेरावतने इशीका आणि इशा अशा दोन भूमिका साकारल्या होत्या. तिची अभिनेता नाना पाटेकर आणि अनिल कपूर यांच्या सोबतची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड प्रमाणात आवडली होती. २०१५ मध्ये या चित्रपटाचा सिक्वेल ‘वेलकम बॅक’ प्रदर्शित झाला. मात्र यात मल्लिका नव्हती. या विषयी बोलताना तिने एक मोठा खुलासा केला आहे.

‘पिंक विल्ला’ ला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा, मल्लिकाला ‘वेलकम’ च्या सिक्वेल मध्ये का नव्हती?, असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ती म्हणाली, “जर वेलकमचा सिक्वेल बनवला तर दिग्दर्शक फकत त्याच्या गर्लफ्रेंडला कास्ट करेल आणि वेलकम बॅक साठी दिग्दर्शकाने त्याच्या गर्लफ्रेंडला घेतलं तर यात आता मी काय करु?”

मल्लिका कोणाची नावं नाही घेणार असे सांगत पुढे म्हणाली, “पण हेच सत्य आहे, बॉलिवूडमध्ये जेव्हा कोणत्या चित्रपटाचा सिक्वेल बनवला जातो तेव्हा त्यांच्या गर्लफ्रेंडला कास्ट करतात. आता माझा या इंडस्ट्रीत कोणी बॉयफ्रेंड नाही त्याला मी काय करु?, मी कधीच कोणत्या ही अभिनेता किंवा दिग्दर्शकाला डेट केलं नाही. अभिनय हे माझे काम आहे, जर तुम्हाला वाटत असेल की मी तुमच्या प्रोजेक्टसाठी योग्य आहे तर मला त्यात काम करायला नक्की आवडेल. तसंच पुढे जेव्हा वेलकम बॅक हा चित्रपटात ती नसण्याचे हेच कारण आहे का असा प्रश्न जेव्हा तिला विचारण्यात आला तेव्हा ती म्हणाली, ” हो…मी या चित्रपटात नसण्याचे हेच कारण आहे.

मल्लिका शेरावत लवकारच ‘नकाब’ या वेब सीरिजमध्ये महत्वाची भूमिका साकारत आहे. या वेब सीरिज ट्रेलर नुकताच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यात मल्लिका सोबत इशा गुप्ता, गौतम रोड देखील प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. ‘नकाब’ या वेब सीरिजमधून मल्लिका डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहे, त्यामुळे तिचे फॅन्स या सीरिजची अतुरतेने वाट बघत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या