Child Actor Veer Sharma and his brother died in Kota Fire : राजस्थानमधील कोटा येथून एक दुर्दैवी बातमी आली आहे. चित्रपट व मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीच्या दोन मुलांचा आगीत गुदमरून मृत्यू झाला. दोन्ही मुलांपैकी धाटका मुलगा मालिकांमध्ये काम करायचा.
कोटामध्ये मध्यरात्री २ वाजता एका फ्लॅटमध्ये आग लागली. या घटनेत दोन भावांचा गुदमरून मृत्यू झाला. शेजाऱ्यांना फ्लॅटमधून धूर येताना दिसला. त्यांनी लगेच दरवाजा तोडला, मुलांना बाहेर काढलं आणि त्यांना एका खासगी रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केलं. मृत मुलांमध्ये, १५ वर्षांचा मोठा मुलगा शौर्य एका खासगी कोचिंग सेंटरमधून आयआयटीची तयारी करत होता, तर धाकटा मुलगा वीर मुंबईत मालिकांमध्ये आणि राजस्थानी गाण्यांमध्ये काम करत होता. वीर बाल कलाकार म्हणूनही ओळखला जात होता.
कोटा येथील अनंतपुरा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या पाथर मंडी परिसरातील दीप श्री नावाच्या बहुमजली इमारतीत ही दुर्दैवी घटना घडली. इमारतीच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या फ्लॅट क्रमांक ४०३ मध्ये अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. काही वेळेतच संपूर्ण फ्लॅटमध्ये धूर पसरला. यावेळी घरात झोपलेल्या दोन निष्पाप भावांचा गुदमरून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मुलांचे आई-वडील कुठे होते?
मुलांचे वडील जितेंद्र शर्मा हे कोटा येथील एका खासगी कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये फॅकल्टी मेंबर आहेत. दोन्ही मुलांची आई रीता शर्मा ही अभिनेत्री आहे. तिने मिस बल्गेरियाचा किताब देखील जिंकला आहे. ती सध्या मुंबईत टीव्ही मालिका आणि चित्रपटांचे शूटिंग करत होती. अपघाताच्या वेळी मुलांचे वडीलही काही कामानिमित्त बाहेर होते आणि मुलं घरी एकटीच होती. दैनिक भास्करने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

काही दिवसांपूर्वीच या कुटुंबाने एक नवीन मर्सिडीज कार खरेदी केली होती. त्यामुळे त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण होते. पण अचानक झालेल्या या अपघाताने संपूर्ण कुटुंब उद्धवस्त केलं आहे.
या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच आनंदपुरा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोन्ही मुलांचे मृतदेह मेडिकल कॉलेजच्या पोस्टमॉर्टम रूममध्ये पाठवले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.