गेल्या काही महिन्यात राज कुंद्रा हे नाव चांगलंच चर्चेत आलं होतं. सेमी पॉर्न चित्रपटाच्या निर्मितीचे आरोप झाल्याने मध्यंतरी राज कुंद्राला अटक झाली. शिल्पा शेट्टीचा नवरा म्हणून यानंतर शिल्पा आणि तिच्या कुटुंबीयांबद्दलही बऱ्याच उलट सुलट गोष्टी बोलल्या आणि लिहिल्या गेल्या. उद्योगपती राज कुंद्रा प्रकरणामुळे संपूर्ण मनोरंजनसृष्टी हादरली होती. राज कुंद्रा सध्या एका वेगळ्या कारणांसाठी ट्रोल होत आहे ते कारण म्हणजे मास्क.

राज कुंद्रा अनेकवेळा माध्यमांच्या समोर आल्यावर कायमच मास्कमध्ये दिसला आहे. नुकताच त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. पत्नीच्या बहिणीच्या वाढिदवसाच्या पार्टीत त्याने हजेरी लावली होती. मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये ही पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत राज सहभागी झाला मात्र त्याने माध्यांना पूर्णपणे टाळले मात्र त्याच्या हटके मास्कने लक्ष वेधून घेतले.

सचिनचा जावई होण्यासाठी…” सारा अली खानबरोबरच्या ‘त्या’ व्हायरल फोटोवरून शुभमन झाला ट्रोल

राजचा हा नवा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्याची खिल्ली उडवण्यास सुरवात केली आहे. एकाने लिहले आहे “हा असे विचित्र मास्क का परिधान करतो?”, तर दुसऱ्याने लिहले आहे “असं काम करतोच का की तोंड लपवावे लागत आहे” तर आणखीन एकाने लिहले आहे, “राज कुंद्राचा चेहराच मी विसरलो आहे.” एकाने तर त्याला थेट विचारले आहे “याचा करोना कधी संपणार?” अशा प्रतिक्रिया येत आहेत. आणखीन एकाने तर त्याची तुलना पॉवर रेंजर्स antman शी केली आहे.

View this post on Instagram

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान राज कुंद्रा मागच्या वर्षी पॉर्नोग्राफी प्रकरणात अडकला होता. त्यानंतर त्याने बराच काळ सोशल मीडियावरून ब्रेक घेतला होता. मात्र तो पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय झाला आहे. राज कुंद्रा मीडियापासून अद्याप दूर आहे. तसेच पॉर्नोग्राफी प्रकरणात लागलेले सर्व आरोप राज कुंद्राने फेटाळले आहेत. काही महिन्यांपूर्वीच तो जामिनावर तुरुंगातून बाहेर आला आहे.