Shilpa Shetty Scold Paparazzi : शिल्पा शेट्टी सध्या ‘सुपर डान्सर ५’ या डान्स रिअ‍ॅलिटी शोच्या सेटवर दिसत आहे. या डान्स रिअ‍ॅलिटी शोच्या पाचव्या सीझनची जज असलेली शिल्पा या शोच्या शूटिंगपूर्वी सेटच्या बाहेर पापाराझींना भेटताना आणि त्यापैकी एकाला ओरडताना दिसली.

‘सुपर डान्सर’च्या पाचव्या सीझनमध्ये जज म्हणून परतणारी शिल्पा शेट्टी अनेकदा पापाराझींशी संवाद साधताना दिसते. यावेळी ती त्यांच्यापैकी एकाला चांगल्या कारणासाठी फटकारताना दिसते. खरं तर, शूटिंगसाठी आत जाण्यापूर्वी, शिल्पा पापाराझींसमोर पोज देते आणि त्यांच्याशी बोलते.

यानंतर ती आत जाऊ लागते, पण नंतर ती वळते आणि पापाराझींच्या जवळ जाऊ लागते. तिथे जमलेल्या पापाराझींपैकी एकाच्या तोंडात तंबाखू असल्याचं तिला दिसतं. तेव्हा ती त्याला हसत हसत पण स्पष्टपणे म्हणते, “तू इथे ये, मला तुझं तोंड बघायचंय…” पापाराझी त्याचे तोंड त्याच्या हातांनी झाकतो आणि शिल्पाला सांगतो की त्याने आता ते खाणे बंद केले आहे. ती पुढे म्हणते, “तंबाखू खाणं बंद कर.” ते ऐकून त्याचे मित्र त्याची चेष्टा करतात.

त्या पापाराझीचा साथीदार शिल्पाला फिल्म सिटीच्या बाहेर तो तंबाखू खातो असे सांगत असल्याचे दिसत आहे. हे ऐकून शिल्पा हसायला लागते आणि म्हणते, ‘हे कसले मित्र आहेत.’ तिला माहीत आहे की तिथे असलेले सर्वजण त्याची खिल्ली उडवत आहेत.

डान्स रिअ‍ॅलिटी शोचा प्रीमियर कधी?

‘सुपर डान्सर’ या रिअ‍ॅलिटी शोचा पाचवा सीझन या आठवड्याच्या शेवटी १९ जुलै रोजी प्रीमियर होईल. ‘सुपर डान्सर’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये शिल्पा शेट्टीबरोबर गीता कपूर आणि कोरिओग्राफर मर्जी पेस्टनजीदेखील जज म्हणून दिसतील. मामाजी म्हणून चाहत्यांना आवडणारे परितोष त्रिपाठी हे या शोचे होस्ट असतील. हा शो दर शनिवार आणि रविवारी रात्री ८ वाजता सोनी टीव्हीवर दाखवला जाईल. लोक तो डिजिटल प्लॅटफॉर्म सोनी लिव्हवरदेखील पाहू शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिल्पा शेट्टी तिच्या बहुप्रतिक्षित कन्नड चित्रपट ‘केडी-द डेव्हिल’ मुळेही चर्चेत आहे. प्रेम दिग्दर्शित हा चित्रपट अ‍ॅक्शनने भरलेला असल्याचे म्हटले जाते, ज्यामध्ये तिच्याबरोबर ध्रुव सरजा, संजय दत्त, नोरा फतेही, रेश्मा नानैया, व्ही रविचंद्रन आणि रमेश अरविंद हे कलाकार आहेत. असे म्हटले जात आहे की, हा चित्रपट १९७० आणि ८० च्या दशकातील बंगळुरूच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या एका सत्य घटनेपासून प्रेरित आहे.