अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा प्रियकर आनंद अहूजा यांची लग्नघटिका समीप आली असून, आता सर्वत्र याच लग्नाची चर्चा सुरु आहे. सोशल मीडियापासून ते कलाविश्व आणि चाहत्यांच्या वर्तुळापर्यंत प्रत्येक ठिकाणी या लग्नाविषयीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. यामध्येच सोनमच्या प्रेमकहाणी पासून ते आनंद अहूजा नेमका आहे तरी कोण, या सर्वच गोष्टींविषयी जाणून घेण्यासाठी अनेकांनी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०१४ मध्ये आनंद आणि सोनम पहिल्यांदाच एकमेकांना भेटले होते. त्यानंतर दिवसागणिक त्यांची मैत्री अधिकच दृढ झाली आणि साधारण महिनाभरातच आनंदने सोनमला प्रपोज केलं होतं. तेव्हापासून सुरु झालेला या दोघांचाही प्रवास आता लग्नाच्या वळणावर येऊन थांबला आहे. ‘भाने’ या कापडाच्या प्रसिद्ध ब्रँडशी तो जोडला गेला असून, जवळपास ३००० कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. दिल्लीतील उच्चभ्रू अशा पृथ्वीराज रोड येथे त्याचा आलिशान बंगला असून, त्याची किंमत जवळपास १७३ कोटी रुपये असल्याचं वृत्त ‘एनडीटीव्ही’ने प्रसिद्ध केलं आहे.

वाचा : ‘who added whom first?’- फेसबुकने जुळवलेल्या एका लग्नाची गोष्ट

दिल्लीच्या या भागात असणारं आनंदचं घर पाहता मुंबईकर सोनम आता दिल्लीकरांची सून होणार असंच म्हणावं लागेल.
सोनमसोबत रिलेशनशिपमध्ये असल्यापासून विविध कार्यक्रमांपासून ते पुरस्कार सोहळे आणि सेब्रिटींनी आयोजित केलेल्या पार्टीलाही आनंदची उपस्थिती पाहायला मिळत होती. त्याच्या मालकीच्या एक्स्पोर्ट हाऊसअंतर्गत GAP, TOMMY, BHANE आणि Veg Non Veg या ब्रँडचा समावेश आहे. सोशल मीडियावरही आनंद बऱ्यापैकी सक्रिय असून, तो नेहमीच सोनमसोबतचे काही सुरेख फोटो पोस्ट करत असतो. सुरुवातीचे काही दिवस आनंद आणि सोनमने त्यांच्या नात्याविषयी बऱ्याच गोष्टी गुलदस्त्यात ठेवल्या होत्या. पण, अखेर या पोस्ट पाहून फॉलोअर्सना त्यांच्या नात्याची कुणकूण लागली होती. अशी ही जोडी आता सहजीवनाला सुरुवात करत असून, संपूर्ण कलाविश्व त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सज्ज असल्याचं पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress sonam kapoor anand ahuja wedding delhi house
First published on: 07-05-2018 at 16:30 IST