सध्या बॉलिवूडमध्ये जीवनपटांची तर चलतीच आहे. एका मागून एक गाजलेल्या व्यक्तिंचे जीवनपट सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या जीवनपटांमध्ये गेल्या वर्षी पूर्वाश्रमीची ‘पॉर्न स्टार’ आणि अभिनेत्री सनी लिओनी हिच्याही जीवनपटाची भर पडली होती. ‘मोस्टली सनी’ या नावाने तिच्या आयुष्यावर बेतलेला माहितीपट गेल्यावर्षी ११ सप्टेंबरला प्रदर्शित झाला होता. कॅनेडिअन फोटोजर्नालिस्ट दिलीप मेहता यांनी या माहितीपटाचे दिग्दर्शन केले आहे. ८४ मिनिटांचा हा माहितीपट कॅनडामध्ये इंग्लिश आणि हिंदी भाषेत प्रदर्शित करण्यात आला होता.

पोटापाण्यासाठी कपिलच्या शोवर निर्भर नाही- उपासना सिंग

‘मोस्टली सनी’ या माहितीपटाला आता वर्ष होत आलं असलं तरी ‘नेटफ्लिक्स इंडिया’ या स्ट्रीमिंग वेबसाइटवर हा माहितीपट आजही ट्रेण्ड करत आहे. कॅनडातील ओंटारियो प्रांतातील सार्निया शहरातील एका शिख कुटुंबात जन्मलेल्या करनजीत कौर वोहराचा सनी लिओनी बनण्यापर्यंतचा प्रवास या माहितीपटाद्वारे दाखवण्यात येत आहे. पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा सनीच्या करिअरचा आलेख या माहितीपटातून दाखवण्यात आला आहे. टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये हा माहितीपट प्रदर्शित करण्यात आला होता.

mostly-sunny

मला इंदू सरकार पाहायचाय!; काँग्रेस नेते संजय निरुपम यांची ‘सेन्सॉर’कडे मागणी

दरम्यान हा माहितीपट भारतात प्रदर्शित करण्याला सनीने मात्र विरोध दाखवला होता. हा माहितीपट काही बाबतीत सनीच्या जीवनातील वास्तवाशी न्याय करत नसल्याचे सनीचे म्हणणे होते. त्यामुळे सिनेमाच्या प्रदर्शनालाही ती उपस्थित राहिली नव्हती. तसेच माहितीपटाच्या निमित्ताने एक टिम सनी ज्या ठिकाणी प्रार्थना करण्यासाठी जायची त्या गुरुद्वाऱ्यामध्ये पाठवली होती. पण, गुरुद्वाऱ्याच्या व्यवस्थापकीय मंडळाने माहिती देण्यास नकार दिला होता अशी माहिती माहितीपटाचे दिग्दर्शक दिलीप मेहता यांनी दिली होती.