बॉलिवूड मधील लोकप्रिय अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. उर्वशीने  इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या प्रत्येक फोटो आणि व्हिडिओ नेटकऱ्यांनची पसंती मिळताना दिसत आहे. इन्स्टावर उर्वशी तिच्या फिटनेस आणि अॅक्शनसाठी ओळखली जाते. या संबंधित फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच तिच्या फॅन अकाऊंटवरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

उर्वशीच्या या व्हिडीओत ती जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहे. यात ती एका माणसाशी लढताना दिसत आहे. तिची ताकद एव्हढी आहे की फकत दोन पंच आणि लाथेत ती त्या माणसाला हरवतान दिसली आहे. उर्वशीचा हा अॅक्शन व्हिडिओ तिच्या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यानचा आहे. यामधील तिची जबरदस्त अॅक्शन पहुन नेटकरी थक्क झाले आहेत. तसंच तिचा या वेगळा अंदाज नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या आधी उर्वशीचा वर्कआउट करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड होतं होता. त्या व्हिडीओमध्ये ती जिममध्ये कठीण वर्कआउट करताना दिसली होती. तिचे अनेक वर्कआउट व्हिडीओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ पाहून चाहते सुद्धा स्वतःच्या फिटनेससाठी प्रेरित होतात. दरम्यान उर्वशी लवकरच तमिल चित्रपटासृष्टीत पदार्पण करणार आहे आणि त्यासाठी खूप मेहनत घेताना दिसत आहे. या चित्रपटात ती माइक्रोबायोलॉजिस्ट आणि  एक आईआईटीयनची भूमिका साकारताना दिसेल. त्यानंतर ती द्विभाषी थ्रिलरमध्ये महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. उर्वशीचला गुरु रंधावा सोबतचं ‘डूब गए’ आणि मोहम्मद रमजान सोबतचं ‘वर्साचे बेबी’ या म्युझिक व्हिडिओसाठी तिला उत्ताम प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. तसंच उर्वशी जियो स्टूडियोची ‘इंस्पेक्टर अविनाश’ या सीरिजमध्ये ती रणदीप हूडा सोबत प्रमुख भूमिका साकारताना दिसेल.