बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार सध्या अडचणीत अडकला आहे. याचे कारण म्हणजे विमल पान मसाल्याची (गुटखा) जाहिरात. या जाहिरातीबद्दल अक्षयने चाहत्यांची माफीही मागितली आहे आणि पुन्हा अशी चूक न करण्याचे आश्वासनही दिले आहे. पण तरी देखील सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात येत आहे. यासगळ्यात अक्षयला चित्रपटसृष्टीतून अनेकांनी पाठिंबा दिला आहे. या व्यतिरिक्त मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमणने देखील अक्षयला पाठिंबा दिला आहे.

मिलिंदने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. “अक्षय कुमार, कारण काहीही असो पण तू योग्य निर्णय घेतला आहेस,” असे मिलिंद सोमण म्हणाला. फक्त मिलिंद नाही तर इतर सेलिब्रिटींनीही अक्षयचे कौतुक केले आहे.

आणखी वाचा : “हे वैयक्तिक मत आहे…”, अक्षयच्या माफीनाम्यानंतर अजय देवगणने केलेले वक्तव्य चर्चेत

आणखी वाचा : ‘या’ जन्मतारखा असलेल्या व्यक्ती असतात नशीबवान, कोणत्याही क्षेत्रात मिळवतात यश

यापूर्वी रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत लक्ष्मणची भूमिका साकारून प्रसिद्ध झालेला अभिनेता सुनील लाहिरीनेही ‘खिलाडी कुमार’ला पाठिंबा दिला होता. अक्षयची पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर करत त्यांनी लिहिले की, ‘मिस्टर खिलाडी कुमार हे लाखो लोकांसाठी केवळ शिस्तबद्ध आदर्श नाहीत, तर ते एक खरे जबाबदार व्यक्ती देखील आहेत, हे त्यांच्या पत्रातून दिसून येते. खरे तर त्यांच्यासारखी माणसे जगात क्वचितच पाहायला मिळतात, त्यांना माझा सलाम.’

आणखी वाचा : सलमानच्या ‘या’ चित्रपटातून श्रेयस तळपदेचा पत्ता कट, मेहूणा आयुष शर्माची एण्ट्री

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अक्षय कुमार सध्या भोपाळमध्ये ‘सेल्फी’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. यात इमरान हाश्मी, नुसरत भरुचा आणि डायना पेन्टी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. याशिवाय अक्षय ‘पृथ्वीराज’, ‘रक्षा बंधन’, ‘मिशन सिंड्रेला’ आणि ‘ओएमजी २’मध्येही दिसणार आहे.