बॉलीवूड इंडस्ट्रीतील ‘तो’ गायक, जो केवळ त्याच्या गाण्यांमुळेच नव्हे तर त्याच्या वजनामुळेही प्रसिद्धीच्या झोतात आला. त्यावेळी त्याचे वजन २३० किलो होते.

आम्ही प्रसिद्ध गायक अदनान सामीबद्दल बोलत आहोत. त्याची अनेक गाणी सुपरहिट ठरली, विशेषतः ‘लिफ्ट करा दे’ आणि ‘भीगी-भीगी रातों में’ यांनी ९० च्या दशकात खळबळ उडवून दिली.

गायक अदनान सामीचे वजन त्याच्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना २३० किलो होते. तो हिट गाणी गात असताना, त्याचे वजन जीवघेणे बनले होते आणि डॉक्टरांनी इशारा दिला होता की जर त्याने त्याची जीवनशैली अशीच चालू ठेवली तर तो जास्त काळ जगू शकणार नाही. अलीकडेच झालेल्या एका संभाषणात त्याने त्याच्या वजनामुळे होणाऱ्या आरोग्य समस्यांबद्दल आणि वजन कमी करण्यास त्याला कशामुळे मदत झाली याबद्दल सांगितले.

‘इंडिया टीव्ही’शी बोलताना अदनान सामीने सांगितले की, गंभीर समस्या असूनही तो त्याच्या आरोग्याची काळजी करत नव्हता. तो त्याच्या वडिलांबरोबर डॉक्टरकडे गेला. तो पुढे म्हणाला, “डॉक्टरांनी मला सांगितले की, माझे रिजल्ट बॉर्डर लाइनवर आहेत. ते म्हणाले, “जर तू अशी जीवनशैली चालू ठेवलीस, तर तू सहा महिन्यांत मरशील. हे माझ्यासाठी धक्कादायक होते, पण मला राग आला, कारण त्यांनी हे सर्व माझ्या वडिलांसमोर सांगितले. मी माझ्या वडिलांना या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले, की डॉक्टर मेलोड्रॅमॅटिक आहेत.”

अदनान पुढे म्हणाला, “डॉक्टरकडे गेल्यानंतर मी थेट बेकरीत गेलो आणि त्यांचे अर्धे सामान खाल्ले. माझे वडील माझ्याकडे रागाने पाहत होते आणि त्यांनी विचारले, “तुला देवाची भीती वाटत नाही का?’ डॉक्टरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांनी मला फटकारले, म्हणून मी त्यांना सांगितले, ‘डॉक्टर काहीही सांगत राहतात.’

अदनानला त्या संध्याकाळी त्याच्या वडिलांशी झालेल्या भावनिक संभाषणाची आठवण झाली. तो म्हणतो, “माझे वडील मला म्हणाले, मी तुला फक्त एकच गोष्ट मागत आहे, कृपया मला माझ्या मुलाला दफन करण्यास सांगू नको, तुला मला दफन करावे लागेल. मी त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहिले आणि मी त्यांना वजन कमी करण्याचे वचन दिले.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अदनानने १६ महिन्यांत १५५ किलो वजन कमी केले आणि त्याचे वजन २३० किलोवरून ७५ किलोवर आले. हे कोणत्याही शस्त्रक्रियेचे परिणाम नव्हते, तर कठोर परिश्रम आणि शिस्तबद्ध जीवनशैलीचे परिणाम होते.