69th National Film Awards Ceremony Live Updates in Marathi : ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा २४ ऑगस्ट रोजी दिल्ली येथे करण्यात आली होती. चित्रपट, साहित्य आणि कला क्षेत्रात सर्वोत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना भारत सरकारकडून हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. यंदा बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टला ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटासाठी आणि क्रिती सेनॉनला ‘मिमी’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर आज (१७ ऑक्टोबर ) नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विजेत्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

हेही वाचा : हेमा मालिनींच्या वाढदिवसाला पोहोचल्या रश्मी ठाकरे, गर्दीतून ‘नमस्कार वहिनी’ ऐकू येताच मागे पाहिलं अन्…, पाहा व्हिडीओ

अभिनेत्री आलिया भट्ट आणि क्रिती सेनॉनचा हा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार आहे. या भव्य सोहळ्याला आलिया भट्ट खास तिच्या लग्नातील साडी नेसून पोहोचली आहे. आलिया भट्टने तिच्या लग्नात बॉलीवूडचा प्रसिद्ध डिझायनर सब्यसाचीने डिझाईन केलेली ऑफ व्हाईट रंगाची सुंदर साडी नेसली होती. राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात लग्नाची साडी पुन्हा एकदा नेसून अभिनेत्रीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. यावेळी कपाळावर लहानशी टिकली, केसात पांढरी फुलं, गळ्यात नेकलेस असा सुंदर लूक आलियाने केला होता.

हेही वाचा : ‘कुछ कुछ होता है’नंतर तब्बल २५ वर्षांनी सलमान खान करण जोहरच्या चित्रपटात झळकणार? दिग्दर्शकाने केला खुलासा, म्हणाला…

आलियाच्या लग्नातील ऑफ व्हाईट रंगाच्या साडीवर सोन्याच्या जरीने सुंदर असं नक्षीकाम केलं आहे. पुरस्कार सोहळ्याला लाडक्या बायकोचं कौतुक करण्यासाठी रणबीर कपूर सुद्धा उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : Video : “दोघी सारख्याच दिसता…”, किशोरी गोडबोले लेकीसह खेळल्या गरबा, मराठी कलाकारांनी पाडला कमेंट्सचा पाऊस

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिनेत्री लग्नाची साडी नेसून पुरस्कार सोहळ्याला पोहोचल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पुरस्कार सोहळ्याला लग्नातील साडी नेसून गेल्यामुळे नेटकऱ्यांनी आलियावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. दरम्यान, ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये ‘द काश्मीर फाइल्स’, ‘गंगुबाई काठीयावाडी’,‘मिमी’, ‘पुष्पा’, ‘आरआरआर’, ‘सरदार उधम’ या चित्रपटांनी बाजी मारली आहे.