Shraddha Kapoor’s Viral Video: अभिनेत्री श्रद्धा कपूर ही बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आजपर्यंत ‘तीन पत्ती’, ‘आशिकी’, ‘द व्हिलन’, ‘हैदर’, ‘हाफ गर्लफ्रेंड’, ‘तू झुठी मैं मक्कार’, ‘स्त्री’, ‘स्त्री २’, ‘छिछोरे’ अशा अनेक चित्रपटांत काम केले आहे.
तिची प्रमुख भूमिका असलेले ‘स्त्री’ आणि ‘स्त्री २’ या चित्रपटांना प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली. २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्त्री २’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता अभिनेत्री तिच्या कोणत्या भूमिका किंवा चित्रपटामुळे नाही तर एका व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमुळे चर्चेत आहे.
श्रद्धाने नुकतीच एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी तिने ‘स्त्री’ चित्रपटातील तिच्या भूमिकेप्रमाणे लूक केला होता. लाल रंगाची साडी, लांब वेणी, असा हा लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आता या कार्यक्रमातील एक व्हिडीओ व्हायरल भयानी या इन्स्टाग्राम चॅनेलने शेअर केला आहे.
गर्दीतून चाहता I Love You म्हणाला अन्…
या व्हिडीओमध्ये पाहायला मिळाले की, श्रद्धा स्टेजवर उभी आहे. यावेळी समोर असलेल्या गर्दीतून एक चाहता “श्रद्धा, आय लव्ह यू”, असे म्हणतो. ते ऐकल्यानंतर गर्दीतील इतर लोक त्यावर ओरडताना दिसतात. श्रद्धा म्हणते की, आता इतक्या उघडपणे म्हणणार का? तुम्हाला माहीत आहे ना, माझे वडील कोण आहेत? त्यानंतर ती हसताना दिसत आहे. तिथे उपस्थित असलेला होस्ट तिच्या चित्रपटातील डायलॉग म्हणतो, “ती स्त्री आहे; ती काहीही करू शकते.”
नेटकरी काय म्हणाले?
श्रद्धाच्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स करीत तिचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “ती खूप दयाळू आहे”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “ती खूप वेगळी आहे”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “फक्त तिच्या वडिलांना माहीत होऊ दे”, एका नेटकऱ्याने लिहिले, “तिचा साधा लूक किती छान आहे”, अशा अनेक कमेंट्स करीत अभिनेत्रीचे कौतुक केले आहे.


अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचे, तर ती लवकरच छोटी स्त्री या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्त्री चित्रपटाच्या आधीच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आता या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
श्रद्धा सोशल मीडियावरदेखील सक्रिय असते. विविध फोटो, व्हिडीओ शेअर करीत ती सर्वांचे लक्ष वेधून घेते. तिचा चाहतावर्ग मोठा आहे. ती कायमच तिच्या गोड अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकते.