अभिनेता आदर जैनने शुक्रवारी (२१ फेब्रुवारी) मुंबईत लग्न केलं. आदर गर्लफ्रेंड अलेखा अडवाणीबरोबर लग्नबंधनात अडकला आहे. गोव्यात दोघांनी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं होतं, त्यानंतर आदर व अलेखा यांनी मुंबईत पारंपरिक पद्धतीने लग्नगाठ बांधली. आदर व अलेखाच्या लग्नात कपूर कुटुंबीय, अंबानी कुटुंबीय उपस्थित होते, तसेच रिसेप्शनला अनेक बॉलीवूड सेलिब्रिटीही आले होते.

आदर जैन हा रणबीर कपूर, करीना कपूर व करिश्मा कपूर यांच्या आत्याचा मुलगा आहे. मेहंदी व हळदी समारंभानंतर आदर-अलेखाचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. त्यांच्या लग्नातील अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अलेखाने लग्नासाठी खास लाल रंगाचा लेहेंगा निवडला होता, या लेहेंग्यावर सोनेरी नक्षीकाम केलेलं होतं. तसेच तिने यावर हिरव्या रंगांचे अमरेल्ड दागिने घातले होते. ग्लॉसी मेकअपमध्ये अलेखा सुंदर दिसत होती. तर, आदरने ऑफ व्हाईट शेरवानी घातली होती. लग्न झाल्यावर दोघांनी पापाराझींना पोजही दिल्या.

पाहा व्हिडीओ –

आदर व अलेखाच्या लग्नात करीना कपूर, सैफ अली खान, करिश्मा कपूर, नीतू कपूर, रणबीर व आलिया, रिद्धीमा कपूर, तिचा पती, लेक समायरा, श्वेता बच्चनचे पती निखिल नंदा व त्यांचा मुलगा अगस्त्य नंदा, अनिल अंबानी व टीना अंबानी, आकाश अंबानी व श्लोका मेहता यांनी हजेरी लावली होती. तर रिसेप्शनला रेखा, अनन्या पांडे आणि इतर अनेक सेलिब्रिटींची मांदियाळी होती.

आदर जैन व अलेखा अडवाणी यांनी १२ जानेवारी २०२५ रोजी गोव्यात लग्न केलं होतं, आता ते पारंपरिक पद्धतीने विवाहबंधनात अडकले.

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आदर जैनने ‘कैदी बँड’, ‘मोगुल’ आणि ‘हॅलो चार्ली’ सारख्या बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आदर अभिनेत्री तारा सुतारियाबरोबर २०२० ते २०२३ या काळात रिलेशनशिपमध्ये होता. त्यावेळी अलेखा अडवाणी ही आदर व तारा यांची खूप चांगली मैत्रीण होती. तारा व आदर यांचे तीन वर्षांनी ब्रेकअप झाले आणि आदरने अलेखाला प्रपोज केलं. अलेखाने होकार दिला आणि आता दोघांनी लग्न केलं आहे.