आमिर खानची लेक आयरा खान नुकतीच नुपूर शिखरेबरोबर लग्नबंधनात अडकली. ३ जानेवारीला नोंदणी पद्धतीने लग्न केल्यानंतर १० जानेवारीला आयरा-नुपूरने ख्रिश्चन पद्धतीने लग्नगाठ बांधली. हा लग्नसोहळा उदयपूरमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला. त्यानंतर काल, १३ जानेवारीला आयरा-नुपूरच्या लग्नाची ग्रँड रिसेप्शन पार्टी पार पडली. या पार्टीला बॉलीवूड सेलिब्रिटींसह राजकीय नेतेमंडळी पाहायला मिळाले. यासंबंधीचे फोटो, व्हिडीओ सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत.

आयरा-नुपूरच्या लग्नाच्या ग्रँड रिसेप्शन पार्टीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र, हेमा मालिनी, रेखा, अनिल कपूर, माधुरी दीक्षित, शाहरुख खान, सलमान खान, रितेश देशमुख असे अनेक सेलिब्रिटी हजर राहिली होते. या पार्टीसाठी आयराने खास लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता. ज्याला मॉर्डन ट्विस्ट होता. या थ्री पीस आउटफिटमध्ये आयराने कन्टेंपरेरी ब्लाउज घातला होता आणि जॉर्जेटची ओढणी घेतली होती. आयराचा हा लूक मोनाली रॉयने डिझाइन केला होता. मोनालीने नुकताच एका माध्यमाशी संवाद साधला. यावेळी तिने आयराच्या लेहंगा याविषयी सांगितलं.

हेही वाचा – Video: रिया चक्रवर्तीच्या भावाला पापाराझी म्हणाले बॉयफ्रेंड, अभिनेत्री भडकली अन् मग…

न्यूज १८च्या वृत्तानुसार, मोनाली आयरासाठी खूप वेगळा लेहंगा डिझाइन केला होता. मोनाली म्हणाली, “आयराबरोबर काम करण्याचा अनुभव खूप भारी होता. तिला खूप डिझाइनबाबत चांगलं समजतं होतं. त्यामुळे तिला पूर्ण प्रोसेस चांगली समजली होती. आयराने मला स्वतंत्रने काम करायला दिलं होतं. म्हणून काम खूप नीट झालं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – Video: ‘जवान’नंतर अ‍ॅटलीच्या नव्या चित्रपटाची घोषणा, वरुण धवनसह झळकणार साऊथची ‘ही’ अभिनेत्री, मुहूर्त पूजेचा व्हिडीओ व्हायरल

पुढे मोनाली म्हणाली, “आयराला पारंपरिक लेहंगा हवा होता. ज्यामध्ये मॉर्डन ब्लाउज पाहिजे होत. त्यामुळे आम्हाला हा पूर्ण सेट करण्यासाठी जवळपास सात महिने लागले. शिवाय ३०० हून अधिक तास लागले.” दरम्यान, आयराचा लेहंगा कच्च्या रेशीमपासून तयार केला होता. ज्यावर भरजड काम केलं होतं.