बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ बॉक्स ऑफिसवर सणकून आपटल्यानंतर आमिर खान फारसा कुठेच दिसला नाही. एक दोन ठिकाणी त्याचं ओझरतं दर्शन घडलं, पण एकूणच लाईमलाईटपासून आमिर बऱ्यापैकी लांब होता. चित्रपट फ्लॉप झाल्याने आणि एकूणच बॉयकॉट ट्रेंडमुळे आमिरने अभिनयातून संन्यास घेतल्याच्या बातम्यादेखील समोर आल्या होत्या. नुकतंच आमिरने याविषयी खुलासा केला आहे.

‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार नुकतंच दिल्लीमध्ये मित्रांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात आमिरने याबद्दल खुलासा केला आहे. चित्रपटातील करिअरबद्दल आणि अभिनयातून काही काळ ब्रेक घेण्याबद्दल आमिरने भाष्य केलं आहे. आमिर म्हणाला, “जेव्हा मी एका चित्रपटात अभिनेता म्हणून काम करतो, तेव्हा इतर गोष्टींचा मला पूर्णपणे विसर पडतो. ‘लाल सिंग चड्ढा’नंतर मी चॅम्पियन नावाच्या चित्रपटावर काम करणार होतो. ती कथा फारच अप्रतिम आहे, पण मला आता असं वाटतंय की आता काही काळ अभिनयातून ब्रेक घ्यायला हवा, माझी आई, परिवार मुलं यांना वेळ द्यायला हवा.”

आणखी वाचा : महेश बाबूच्या वडिलांचे निधन : तेलुगू चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या सुपरस्टार कृष्णा यांचे निधन, महेश बाबूवर शोककळा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’ला प्रेक्षकांनी नापसंती दर्शवली. हा चित्रपट आमिरच्या कारकीर्दीतील सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट ठरला. त्यामुळेच आमिर या संगळ्यातून ब्रेक घेत असल्याची चर्चा होत आहे. शिवाय आमिरच्या ३५ वर्षाच्या कारकीर्दीतील हा पहिलाच ब्रेक असेल असंही त्याने स्पष्ट केलं आहे. आमिर म्हणाला, “मी गेली ३५ वर्षं सलग काम करत आहे. त्यामुळे मी अजूनही पुढे काम करणं हा माझ्या जवळच्या व्यक्तींवर अन्याय होईल, त्यांनाही वेळ देणं तितकंच महत्त्वपूर्ण आहे. किमान पुढचं एक ते दीड वर्षं तरी मी निदान अभिनेता म्हणून काम करणार नाही.”

‘चॅम्पियन’ या आगामी चित्रपटाची निर्मिती आमिर खान करणारी असून त्यासाठी तो चांगलाच उत्सुक आहे. नुकताचा काजोलचा ‘सलाम वेंकी’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्यात आमिर पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.