अभिनेता आमिर खान हा त्याच्या कामाप्रमाणेच त्याच्या वैयक्तिक आयुषयामुळे नेहमी चर्चेत असतो. त्याच्या कृतीने तो सर्वांचं लक्ष त्याच्याकडे वेधून घेतो. नुकताच तो त्याची पूर्वाश्रमीची पत्नी किरण राव हिच्याबरोबर भोपाळमध्ये एका लग्नात सहभागी झाला होता. यावेळचा त्याचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. यात तो अभिनय नाही तर चक्क गाताना दिसत आहे.

भोपाळमध्ये नुकताच एक शाही विवाहसोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला आमिर खानबरोबरच कार्तिक आर्यननेही हजेरी लावली. या लग्नात त्यांनी त्यांनी खूप मजा मस्ती केली. यादरम्यानचे त्यांचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या लग्नात आमिर खान आणि कार्तिक आर्यनने बॉलिवूडच्या एका लोकप्रिय गाण्यावर ठेका धरत चाहत्यांना खूश करून टाकलं. पण लक्ष वेधलं गेलं ते आमिर खानच्या गाण्याने.

आणखी वाचा : ‘बेशरम रंग’मध्ये दीपिका पदुकोण…” गाण्याची पार्श्वगायिका शिल्पा रावचं वक्तव्य चर्चेत

या लग्नात आमिर खानने काळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती आणि नेहमीप्रमाणेच त्याने त्याच्या ग्रे लूकमध्ये हजेरी लावली. कार्तिक आर्यननेसुद्धा काळ्या रंगाचा कोट, कुर्ता आणि पॅन्ट परिधान केली होती. आधी या दोघांनी प्रियंका चोप्रा, रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर यांच्यावर चित्रित झालेल्या ‘तूने मारी एन्ट्रीयां’ या गाण्यावर डान्स केला आणि त्यानंतर आमिर खानने त्याच्या तुफान गाजलेल्या ‘राजा हिंदुस्तानी’ चित्रपटातील ‘आए हो मेरी जिंदगी में’ हे गाणं गायलं.

हेही वाचा : फक्त सलमानच नव्हे तर आमिर खानच्या बहिणीनेही ‘पठाण’मध्ये साकारली आहे महत्वपूर्ण भूमिका, तुम्ही तिला ओळखलंत का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अगदी दिलखुलासपणे त्याने हे गाणं गायलं. त्याचा आवाजाने सर्वजणच भारावून गेले. यावेळचा त्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्स करत त्याच्या या टॅलेंटचं कौतुक करत आहेत.