2023 मधील बहुप्रतिक्षित चित्रपट पठाण हा नुकताच प्रदर्शित झाला. शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात सलमान खानचा देखील कॅमिओ आहे. त्याची या चित्रपटात एन्ट्री होणं हे त्याच्या चाहत्यांसाठी एक मोठं सरप्राईज होतं. सलमानबरोबरच या चित्रपटात आमिर खानच्या बहिणीनेही एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

‘पठाण’ चित्रपटातून शाहरुख खानने चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या घोषणेपासूनच त्याचे चाहते या चित्रपटासाठी प्रचंड उत्सुक होते. या चित्रपटात प्रेक्षक शाहरुख खानला पाहायला जात आहेत. पण त्यांना नवनवीन सरप्राईज या चित्रपटातून मिळत आहे. आधी या चित्रपटात सलमान खानला पाहून सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला. त्याचबरोबर आमिर खानच्या बहिणीनेदेखील या चित्रपटात काम केलं आहे.

आणखी वाचा : “शाहरुख हा धर्मनिरपेक्ष…” जावेद अख्तर यांनी किंग खानबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत

आमिर खानची बहिण निखत खान हेगडे हिने या चित्रपटात शाहरुख खानच्या मानलेल्या आईची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात शाहरुख खान ची व्यक्तिरेखा अनाथ असलेली दाखवली असल्याने निघतने शाहरुखला मुलगा मानल्याचं दाखवला गेलं आहे. यात ती एका अफगाणी महिलेची भूमिका साकारत आहे. तिनेच शाहरुखला पठाण हे नाव चित्रपटात दिलं आहे. तिला त्याच्या सुरक्षेची काळजी असल्याने ती त्याच्या हातावर तावीज बांधते. यावेळी ती खूपच भावुक झालेली दिसते. ही निखत आमिर खानची बहीण आहे.

हेही वाचा : चित्रपटगृहात सुपरहिट पण IMDB वर निघाली ‘पठाण’ची हवा, ‘इतक्या’ प्रेक्षकांनी दिलं १० पैकी १ रेटिंग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या आधी निखतने ‘मिशन मंगल’, ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’, ‘सांड की आंख’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच ‘लगान’, ‘हम हैं राही प्यार के’ आणि ‘तुम मेरे हो’ या चित्रपटांची निर्मितीही केली आहे. आता ‘पठाण’ चित्रपटातील तिच्या कामाचं कौतुक होत आहे. ‘पठाण’ चित्रपटाला जगभरातून प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला आहे. दिवसातच या चित्रपटाने शंभर कोटींचा आकडा पार केला आहे.