आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटात छोट्या बबिता फोगाटची भूमिका साकारणाऱ्या सुहानी भटनागरचं अवघ्या १९व्या वर्षी निधन झालं. डरमॅटोमायोसायटिस नावाच्या दुर्मिळ आजाराने १६ फेब्रुवारी २०२३ रोजी तिचा मृत्यू झाला. अभिनेत्रीच्या आकस्मिक निधनाने कुटुंबीयांसह तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. तसेच तिच्या निधनानंतर अभिनेता आमिर खान याने फरीदाबाद येथील तिच्या कौटुंबिक घरी सुहानीला अंतिम श्रद्धांजली वाहिली. याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुहानीच्या आकस्मिक निधनानंतर तिला श्रद्धांजली वाहण्यासाठी आमिर खान सुहानीच्या घरी पोहोचला. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये सुहानीच्या फोटोच्या बाजूला आमिर खान तिच्या कुटुंबासमवेत दिसत आहे. ‘दंगल’ या त्यांच्या हिट चित्रपटात सुहानीने आमिरच्या मुलीची भूमिका साकारली होती.

दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) येथे डरमॅटोमायोसायटिस या दुर्मिळ आजारावर सुहानीचे उपचार सुरू होते. या आजाराची लक्षणे दोन महिन्यांपूर्वी सुहानीच्या शरीरावर दिसू लागली होती. यात तिच्या डाव्या हाताला सूज येण्यास सुरुवात झाली होती असे सुहानीच्या आईने सांगितले.

हेही वाचा… ट्विंकल खन्नाच्या ‘त्या’ विधानावर कंगना रणौतचे खडेबोल; म्हणाली, “पुरुषांना प्लास्टिकची बॅग…”

सुहानीच्या निधनानंतर एएनआयला दिलेल्या मुलाखतीत, सुहानीची आई पूजा भटनागर यांनी आमिरसह असलेल्या संबंधांविषयी खुलासा केला आणि सांगितले की आमिर खानने त्यांच्या कुटूंबाला आयरा खानच्या लग्नाचे आमंत्रण दिले होते.

सुहानीच्या आईने सांगितले, “आमिर सर नेहमी सुहानीच्या संपर्कात राहिले. ते एक चांगले व्यक्ती आहेत. आम्ही त्यांना तिच्या आजाराची माहिती आधी दिली नाही कारण तेव्हा आम्हीच खूप अस्वस्थ होतो. आम्ही ही गोष्ट कोणालाच सांगितली नाही आणि स्वत:जवळ ठेवली. जर सुहानीच्या आजारबद्दल आम्ही आमिर सरांना सांगितले असते तर त्यांनी आम्हाला लगेच संपर्क केला असता. सुहानीच्या पहिल्या भेटीपासूनच आमिर सर आणि सुहानीचा बॉन्ड खूप छान झाला होता. आयराच्या लग्नाचं रितसर आमंत्रणही, त्यांनी आम्हाला दिलं होतं.”

हेही वाचा… सलमान खानच्या पँटवर त्याचाच चेहरा; अभिनेत्याचा एअरपोर्ट लूक पाहून चाहते म्हणाले…

आयराच्या लग्नाला न येण्यामागचं कारण सांगताना सुहानीच्या आई म्हणाल्या “सुहानी त्यावेळी फ्रॅक्चरमधून बरी झाली होती आणि ती प्रवास करू शकत नव्हती.”

दरम्यान, शनिवारी १७ फेब्रुवारीला सुहानीच्या निधनाची बातमी मिळाल्यानंतर, आमिर खान प्रॉडक्शनने त्यांच्या एक्स हँडलवर एक पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला. “आमच्या सुहानीच्या निधनाबद्दल ऐकून आम्हाला खूप दुःख झालंय. सुहानीची आई पूजाजी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला बळ मिळो अशी प्रार्थना. ‘दंगल’ चित्रपट नक्कीच सुहानीशिवाय अपूर्ण राहिला असता. सुहानी, तू कायम आमच्या हृदयात राहशील,” अशा शब्दांत सुहानीसाठी ती खास पोस्ट शेअर केली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aamir khan visits late dangal actor suhani bhatnagars house in faridabad photo went viral dvr
First published on: 23-02-2024 at 19:28 IST