Aaradhya Bachchan Video: अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नातील काही फोटो व व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा ऐश्वर्या राय व बच्चन कुटुंबात सर्व आलबेल नसल्याच्या चर्चा होत आहेत. संपूर्ण बच्चन कुटुंबीय एकत्र अनंत-राधिकाच्या आशीर्वाद सोहळ्याला आले, तर ऐश्वर्या मुलगी आराध्याबरोबर (Aaradhya Bachchan Video) वेगळी आली होती. यानंतर आता या दोघी मायलेकींचा विमानतळावरील व्हिडीओ व्हायरल होत आहे.

अनंत व राधिकाच्या शुभ आशीर्वाद सोहळ्याला महानायक अमिताभ बच्चन यांनी पत्नी जया बच्चन, मुलगी श्वेता बच्चन, जावई निखिल नंदा, मुलगा अभिषेक बच्चन, नातू अगस्त्य नंदा व नात नव्या नवेली नंदाबरोबर हजेरी लावली. या सर्वांनी एकत्र फोटोसाठी पोजही दिल्या. पण या फोटोत सूनबाई ऐश्वर्या राय व नात आराध्या या दोघी नव्हत्या. त्यानंतर थोड्याच वेळाने या मायलेकी या सोहळ्याला पोहोचल्या, यावेळी त्यांनी रेखा यांची भेटही घेतली. आता या दोघी मुंबई विमानतळावर पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत.

पाहा व्हिडीओ –

‘या’ अभिनेत्याने राधिका-अनंतची करून दिली ओळख? मुकेश अंबानींनी त्याला ३० कोटींची दिली भेटवस्तू? त्याचे वडील म्हणाले…

ऐश्वर्या व आराध्या काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये ट्विनिंग करून एअरपोर्टवर पोहोचल्या होत्या. तिथे पापाराझी त्यांचे फोटो व व्हिडीओ काढण्यासाठी गर्दी करत होते. त्यामुळे या दोघीही त्यांना काळजीपूर्वक फोटो व व्हिडीओ काढण्यास सांगत होत्या. नंतर त्या पुढे निघून गेल्यानंतरही पापाराझी तिथेच अचानक लोखंडी बॅरियरचा आवाज आला, त्यामुळे आराध्याने मागे वळून पाहिलं आणि त्यांना careful असं म्हटलं. आराध्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून काही जणांनी आराध्या आजी जया बच्चन यांच्याप्रमाणे रागीट असल्याचं म्हटलं आहे, तर काहींनी मात्र पापाराझींनी काळजीपूर्वक व्हिडीओ काढायला हवेत, असं म्हटलं आहे.

aishwarya rai daughter at anant ambani wedding
बच्चन कुटुंबाचा एकत्र फोटो, दुसरीकडे ऐश्वर्या राय बच्चन व आराध्या

Video: बच्चन कुटुंबाच्या फोटोत सूनबाईंची गैरहजेरी; ऐश्वर्या रायला लेकीसह पाहताच रेखा पुढे आल्या अन् बिग बींच्या नातीला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Cannes मध्ये पाहायला मिळालं मायलेकीचं बाँडिंग

आराध्या व ऐश्वर्या या मायलेकीचे बाँडिंग खूपदा पाहायला मिळते. ऐश्वर्या काही दिवसांपूर्वी कान फिल्म फेस्टिव्हलला गेली होती, त्यावेळी तिच्या हाताला दुखापत झाली होती. आराध्या आईची बॅग उचलून तिला मदत करताना दिसली होती. इतकंच नाही तर कान फिल्म फेस्टिव्हलमध्येही ती सतत आईची काळजी घेताना दिसली होती. त्यांचे फोटो व व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते अवघ्या १२ वर्षांच्या आराध्याचं खूप कौतुक करत होते. आराध्या ही अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चन यांची एकुलती एक लेक आहे.