अभिनेत्री अनू अगरवालची जीवनकथा अगदी हेलावून टाकणारी आहे. अनू ही एक मॉडेल होती आणि तिला समाजसेविका व्हायचं होतं. ती ‘आशिकी’ या चित्रपटानंतर रातोरात स्टार झाली. तिचा हा चित्रपट तुफान गाजला. त्या काळात जेव्हा गोरेपणा हेच सौंदर्य मानलं जायचं, तेव्हा ती याला अपवाद ठरली. काही वर्षांनंतर तिने योगाभ्यास करण्यासाठी या दुनियेला रामराम ठोकला होता.

१९९९ मध्ये अनूचा अपघात झाला आणि ती कोमामध्ये गेली. अपघातापूर्वी ती एका आश्रमात राहायची. २००१ साली तिने संन्यास घेतला आणि पूर्ण टक्कल करण्याचा निर्णय घेतला होता. अनूने नुकतंच युट्यूबर सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्या या आध्यात्मिक जीवनाविषयी खुलासा केला आहे.

आणखी वाचा : सुश्मिता सेनच्या ‘आर्या’चा पुढचा सीझन लवकरच येणार भेटीला; सिकंदर खेरने पोस्ट करत दिली माहिती

या मुलाखतीत अनू म्हणाली, “मी जेव्हा साधू म्हणून माझं जीवन व्यतीत करत होते तेव्हा मी -५ हून खाली तापमानात राहायचे. तिथे कुठेही गीझर नव्हता. माझ्याकडे तेव्हा फक्त २ जोडी कपडे आणि एक स्वेटर होता, यावरच मी कित्येक वर्षं काढली आहेत. तेव्हा या वातावरणात राहायची तिला अजिबात सवय नव्हती. रोज सकाळी ४.३० वाजता रोजची कामं आटपून मी अध्यात्माच्या वर्कशॉपसाठी जायचे. त्यासाठी मला मध्यरात्रीच उठून तयारी करावी लागायची.”

साधू म्हणून जगताना नेमकं अनूला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागायचा याबद्दलही तिने खुलासा केला आहे. पुढे ती म्हणाली, “कित्येक महीने मी थंड पाण्यानेच आंघोळ करायचे, कपडे धुवायचे. यामुळे कित्येक महीने माझे हातपाय चांगलेच गोठले होते. पण कालांतराने या सगळ्या गोष्टी खूप सुसह्य वाटू लागल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२००६ साली ती परत आले आणि लोकांना भेटू लागली. माध्यमांनीही तिची दखल घेतली. लोकांनी तिचे आधीचे आणि आत्ताचे फोटो व्हायरल करायला सुरुवात केली. अभिनेत्री अनू अगरवाल ‘आशिकी’ या चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली. तिने ‘खलनायिका’ या चित्रपटातही महत्त्वाची भूमिका साकारली होती. यात तिच्यासोबत अभिनेते जितेंद्र, अभिनेत्री जयाप्रदा, मेहमूद, वर्षा उसगावकर हे कलाकार होते. नुकतीच अनूने ‘इंडियन आयडल’च्या मंचावर हजेरी लावली होती.