Abhishek Bachchan Post: अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते एक्सवर, फेसबुकवर रोज पोस्ट करत असतात. काही वेळा ते अशा क्रिप्टिक पोस्ट करतात की त्यांना नेमकं काय म्हणायचंय? याचा विचार करून चाहतेही गोंधळतात. आता अशीच क्रिप्टिक पोस्ट बिग बींचा मुलगा, अभिनेता अभिषेक बच्चनने केली आहे. अभिषेकची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.
काही तासांपूर्वी अभिषेकने एका कागदावर लिहिलेल्या काही ओळी शेअर केल्या आहेत. ज्यात ‘मला एकदा गायब व्हायचं आहे, मला पुन्हा गर्दीत स्वतःला शोधायचं आहे. माझ्याकडे जे काही होते ते सर्व मी माझ्या लोकांना दिलं, आता मला फक्त स्वतःसाठी थोडा वेळ हवा आहे,’ अशा आशयाच्या ओळी हिंदीत लिहिलेल्या आहेत.
“कधीकधी स्वतःला भेटण्यासाठी, तुम्हाला सर्वांमधून गायब व्हावं लागतं,” असं कॅप्शन देऊन अभिषेक बच्चनने ही पोस्ट शेअर केली आहे.
अभिषेक बच्चनची पोस्ट
चित्रपटाचं प्रमोशन की आणखी काही?
अभिषेक बच्चनची ही पोस्ट पाहून चाहते संभ्रमात आहेत. अभिषेकची ही पोस्ट नेमकी त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आहे की तो एखाद्या चित्रपटाचं प्रमोशन करतोय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. काही लोक त्याच्या या पोस्टचं कनेक्शन ऐश्वर्या रायबरोबरच्या नात्याशी लावत आहेत. जे होतं ते सगळं जवळच्या लोकांना दिलंय, आता स्वतःसाठी वेळ हवाय, असं त्यात लिहिलं आहे. त्यामुळे ऐश्वर्या व अभिषेकच्या नात्यात सगळं आलबेल आहे की नाही, असं चाहते विचारत आहे.
जिनिलीया डिसुझाचं चुकून जॉन अब्राहमशी झालेलं लग्न? देशमुखांच्या सूनबाईने चर्चेवर सोडलं मौन, म्हणाली…
अभिषेक बच्चन सोशल मीडियावर फार सक्रिय नाही. सहसा तो चित्रपटाच्या प्रमोशनच्या पोस्ट शेअर करत असतो. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही फारसं सोशल मीडियावर पोस्ट करत नाही. त्यामुळे आता त्याने सर्वांमधून गायब होण्यासंदर्भात अचानक पोस्ट केल्याने चर्चांना उधाण आलं आहे. कदाचित हे अभिषेकच्या आगामी चित्रपटासंदर्भात असू शकतं, असंही काहींना वाटत आहे. अभिषेकच्या आगामी सिनेमाचं नाव ‘लापता’ असू शकतं, असा अंदाज काहींनी सोशल मीडियावर वर्तवला आहे.
अभिषेक बच्चनने ऐश्वर्याबद्दल घरी सांगितल्यावर अमिताभ बच्चन म्हणालेले, “आम्हाला काय देणं-घेणं…”
अभिषेक बच्चनच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास नुकताच तो ‘हाऊसफुल 5’ मध्ये झळकला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे आणि अजूनही याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटात अक्षय कुमार, नर्गिस फाखरी, चित्रांगदा सिंह, रितेश देशमुख, चंकी पांडे, फरदीन खान, नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ, संजय दत्तसह अनेक कलाकार आहेत.
अभिषेक बच्चनचा ओटीटीवरही जलवा पाहायला मिळतोय. ‘बी हॅप्पी’ व शूजित सरकारच्या ‘आय वाँट टू टॉक’ मध्ये अभिषेक झळकला होता. हे दोन्ही चित्रपट ओटीटीवर रिलीज झाले होते. या चित्रपटांमधील त्याच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं.