दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमधील खूप मोठं नाव आहे. पण त्यांच्याइतकं नाव किंवा हिट चित्रपट त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चनला देता आले नाहीत. अभिनय तसेच कारकिर्दीतील चित्रपटांवरून अभिषेक बच्चन आणि त्याचे वडील अमिताभ बच्चन यांची नेहमीच तुलना केली जाते. यात अमिताभ बच्चन हे कायम वरचढ असतात. यावरून अभिषेकला बऱ्याचदा ट्रोलिंगचा सामनाही करावा लागतो. वडिलांइतकं बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण न करू शकल्याबद्दल त्याच्यावर टीकाही होते.

लोक टीका करत असले तरी बिग बींना मात्र आपल्या लेकाचा खूप अभिमान आहे. ते बऱ्याचदा पोस्ट करून किंवा कार्यक्रमांमध्ये अभिषेकचं कौतुक करत असतात. अलीकडेच ओटीटी फिल्मफेअर पुरस्कारांची घोषणा झाली. या पुरस्कार सोहळ्यात अभिषेक बच्चनच्या ‘दसवी’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. तसेच अभिषेक बच्चन सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला. अभिषेकला पुरस्कार मिळाल्यानंतर खूश झालेल्या बिग बींनी ट्वीट करून त्याचं कौतुक केलं.

“लोकांनी तुझी खिल्ली उडवली पण तू…” लेकाच्या उत्कृष्ट कामगिरीचं अमिताभ बच्चन यांच्याकडून कौतुक

अमिताभ बच्चन यांनी एक ट्वीट केलं होतं. त्यात “मोस्ट डिझर्विंग अवॉर्ड… शाब्बास भय्यू. तू सर्वोत्तम होतास आणि यापुढेही राहशील. तू तुझ्या प्रामाणिकपणाने स्वतःला सिद्ध केलं आहेस. असंच काम यापुढेही करत राहा. लोक कदाचित तुझी थट्टा करू शकतील, पण ते तुला दुर्लक्षित करू शकणार नाहीत,” असं म्हटलं होतं. यावर लेखिला तस्लीमा नसरीन यांनी प्रतिक्रिया देत अभिषेक अमिताभ यांच्यापेक्षा उत्तम नसल्याचं म्हटलं होतं.

तस्लिमा नसरीन यांनी ट्विटरवर अभिषेक बच्चन अमिताभ बच्चन इतका प्रतिभावान नसल्याचं म्हटलं आहे. “अमिताभ बच्चन जी त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनवर खूप प्रेम करतात. त्यांना असं वाटतं की अभिषेकमध्ये त्यांच्या इतकी प्रतिभा आहे, पण तसं नाही. अभिषेक चांगला आहे पण मला वाटतं की तो अमितजींसारखा प्रतिभावान नाही,” असं ट्वीट तस्लिमा यांनी केलं होतं. यावर अभिषेकने दिलेल्या प्रतिक्रियेनं लक्ष वेधून घेतलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना अभिषेक बच्चन म्हणाला, “तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात मॅडम, वडिलांपेक्षा प्रतिभावान कोणताही मुलगा नसतोच. ते कायम बेस्ट राहतील. मी त्यांचा अभिमान असलेला मुलगा आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
abhishek bachchan
अभिषेक बच्चनने तस्लिमा नसरीन यांना दिलेला रिप्लाय

अभिषेकच्या या ट्वीटवर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी अभिषेकच्या या समजदारपणाचं कौतुक केलं आहे.