scorecardresearch

Premium

“लॉजिक नहीं मॅजिक का खेल…” अभिषेक बच्चन व सैयामी खेरच्या आगामी ‘घुमर’चा फर्स्ट लूक आला समोर

येत्या तीन दिवसांत या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. अभिषेकने याआधी आर. बल्की यांच्यासह ‘पा’ चित्रपटात काम केलं आहे

ghoomer-first-look
फोटो : सोशल मीडिया

ऑगस्ट महिना बॉलिवूडसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. बऱ्याच मोठमोठ्या स्टार्सचे चित्रपट या महिन्यात प्रदर्शित होणार आहेत. ११ ऑगस्ट रोजी अक्षय कुमारचा ‘ओह माय गॉड २’ आणि सनी देओलचा ‘गदर २’ प्रदर्शित होणार आहे. या दोन्ही चित्रपटांची सध्या जबरदस्त हवा आहे. याबरोबरच आयुष्मान खुरानाचा ‘ड्रीम गर्ल २’सुद्धा ऑगस्ट महिन्यातच येणार आहे. अशातच आता अभिषेक बच्चनच्या आगामी ‘घुमर’ चित्रपटाची चर्चा होऊ लागली आहे.

आर बल्की दिग्दर्शित ‘घुमर’ या चित्रपटाचं नुकतंच पोस्टर प्रदर्शित झालं आहे. अभिषेक बच्चनने त्याच्या सोशल मीडिया हॅंडलवर हे पोस्टर शेअर केलं आहे. चित्रपट एका विकलांग खेळाडूच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर बेतलेला आहे. या महिला क्रिकेटपटूची भूमिका अभिनेत्री सैयामी खेर हीने निभावली आहे.

kabhi-haan-kabhi-naa
‘कभी हां कभी ना’च्या रिमेकमध्ये शाहरुख खानची भूमिका कुणी करावी? सूचित्रा कृष्णमूर्ती म्हणाल्या, “हे पात्र…”
razakar-trailer
“ओम शब्द आणि भगवा रंग…”, हैदराबाद नरसंहारावर बेतलेल्या ‘रजाकार’ चित्रपटाचा अस्वस्थ करणारा ट्रेलर प्रदर्शित
snehal sidham in Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya
वनिता खरात, प्रियदर्शनीनंतर शाहीद कपूरच्या चित्रपटात ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी! म्हणाली, “कळवायला उशीर…”
bobby-deol-animal-spin-off
बॉबी देओलच्या चाहत्यांसाठी खुशखबर, अब्रार हकवर येणार स्वतंत्र चित्रपट; ‘अ‍ॅनिमल’च्या मार्केटिंग हेडचा मोठा खुलासा

आणखी वाचा : “मी फक्त बॉलिवूड स्टार नाही…” ‘Y+’ सुरक्षेवरुन भाष्य करणाऱ्या सुब्रमण्यम स्वामींना कंगना रणौतचं सडेतोड उत्तर

नुकतंच चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले असून यात संयामीचा एक हात नसूनही ती अत्यंत आत्मविश्वासाने दुसऱ्या हातात क्रिकेटचा बॉल घेऊन उभी असलेली दिसत आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. पोस्टरमध्ये अभिषेकचा लूकही प्रेक्षकांना आवडला असून हा चित्रपट वास्तववादी परिस्थितीचं चित्रण करेल अशी अपेक्षा प्रेक्षकांना आहे.

लवकरच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. अभिषेकने याआधी आर. बल्की यांच्यासह ‘पा’ चित्रपटात काम केलं आहे. ‘घुमर’ हा चित्रपट १८ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अभिषेक आणि सैयामीसह अंगद बेदी, शबाना आझमी यांच्यासारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Abhishek bachchan saiyami kher starrer ghoomer poster and first look out avn

First published on: 31-07-2023 at 12:43 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×