Actor Rajesh Kumar Farming Days: ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या मालिकेतील लोकप्रिय अभिनेता राजेश कुमारने त्याच्या करिअरमध्ये अनेक मालिका व चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याने करिअरच्या शिखरावर असताना अभिनय सोडायचा निर्णय घेतला आणि २०१७ साली तो गावी जाऊन शेती करू लागला. शेतकरी कुटुंबातील राजेशने शेती करायचं ठरवलं, पण त्याच्यावर प्रचंड कर्ज झालं. परिस्थिती अशी आली की त्याला त्याच्या मुलाच्या शाळेबाहेर भाजीपाला विकावा लागला, त्याने भावुक होत त्या आठवणी सांगितल्या आहेत.

राजेश म्हणाला, “स्टार्टअप अयशस्वी झाल्याने मी माझ्या मुलाच्या शाळेबाहेर भाजीपाला विकू लागलो. लोक मला वेडा म्हणत होते. माझ्या मुलाने मला त्याच्या शाळेबाहेर भाजी विकताना पाहिलं आणि तो त्याच्या शिक्षकांकडे गेला आणि म्हणाला, ‘तुम्ही माझ्या वडिलांकडून भाजी घ्याल का?’ तेव्हा तो तिसरीत होता. मग त्याचे मित्र वेगवेगळ्या वर्गात जाऊन सांगायचे की मी भाजी विकत आहे आणि शिक्षकांना माझ्याकडून भाजी विकत घेण्याची विनंती करायचे.”

शिव ठाकरेला ‘बिग बॉस मराठी’ जिंकल्यावर २५ लाखांपैकी मिळालेले फक्त ‘इतके’ रुपये; यंदाच्या विजेत्याला किती मिळणार?

“मी क्षुल्लक काम करत नाही हे दाखवण्यासाठी मी माझ्या मुलाच्या शाळेबाहेर भाजी विकली. हे चांगलं काम आहे असं मुलांनी समजावं, हा माझा उद्देश होता. माझा उद्देश शेतकरी नव्हे तर ग्राहकांना शिक्षित करणं होता. कारण जी कोथिंबीर ग्राहक फुकट मागतात, ते पिकवायलाही मेहनत लागते,” असं राजेश कुमार म्हणाला.

रेखा यांच्याबरोबरच्या नात्याबद्दल विचारल्यावर अमिताभ बच्चन म्हणाले होते, “ती माझी…”

काय चुकलं?

राजेशने हे पाच वर्षे हे काम केलं आणि त्याच्यावर दोन कोटींचं कर्ज झालं. “माझं गणित चांगलं नव्हतं. माझं एका किलोमागे २२-२५ रुपयांचं नुकसान होत होतं, पण ते मला कळलंच नाही. माझे सुमारे १२ ते १५ लाख रुपयांचे नुकसान झाले होते. माझ्यावर आधीच असलेल्या सुमारे १ कोटी रुपयांच्या कर्जात भर पडली. मग मी व्यवहार आणि ऑर्डरवर लक्ष ठेण्यासाठी ॲप बनवण्याचा विचार केला, कारण व्हॉट्सॲपमुळे सगळा गोंधळ होत होता. मात्र ॲप तयार झाल्यानंतर ते बनवणाऱ्याने माझा विश्वासघात केला. ॲप बनवल्यावर मी खूप पैसे गमावले, शेवटी माझे स्टार्ट-अप पूर्णपणे बंद करावे लागले,” असं राजेश म्हणाला.

अरबाज पटेलचं ब्रेकअप! घराबाहेर आल्यावर ‘ती’ कमिटमेंट मोडली; स्वत:च खुलासा करत म्हणाला…

२ कोटींचं कर्ज घेऊन मरेन – राजेश कुमार

“ज्यांनी या व्यवसायात गुंतवणूक केली होती, त्या मित्रांना आणि कुटुंबियांना मला उत्तर द्यावं लागलं. शेतकऱ्यांना उत्तरं द्यावी लागली. कर्ज खूप झालं होतं, त्यामुळे मला वाटलं की आता मार्ग शोधायला हवा, नाहीतर मी जवळपास २ कोटी रुपयांचे कर्ज घेऊन मरेन”, असं राजेश म्हणाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिनयात पुनरागमन

राजेश कुमारने जितेंद्र कुमारच्या ‘कोटा फॅक्टरी २’ मधून पुनरागमन केलं. नंतर तो शाहीद कपूरच्या ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ आणि नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘रौतू का राज’मध्ये झळकला.