गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी घरं खरेदी करताना दिसत आहेत. नॅशनल क्रश तृप्ती डिमरी, अभिनेता आमिर खान आणि जावेद अख्तर यांच्यानंतर आता अभिनेता रोनित बोस रॉय आणि त्याची पत्नी नीलम बोस रॉय यांनीही मुंबईत कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केली आहे. या जोडप्याने वर्सोवामध्ये अपार्टमेंट विकत घेतलं आहे.

‘इंडेक्स टॅप’ या वेबसाईटवर मालमत्तेच्या नोंदणीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. या जोडप्याने मुंबईच्या प्रतिष्ठित वर्सोवा परिसरात १८.९४ कोटी रुपयांमध्ये ४,३५८ चौरस फूट अपार्टमेंट विकत घेतले आहे. १० जून २०२४ रोजी या व्यवहाराची नोंदणी झाली. यासाठी १.१३ कोटी रुपये मुद्रांक शुल्क आणि ३० हजार रुपये नोंदणी शुल्क भरण्यात आले. रोनित रॉयने घेतलेले अपार्टमेंट हे मॅक्रोटेक डेव्हलपर्सच्या लोढा वर्सोवा प्रकल्पात आहे. या घराबरोबर रोनितला चार पार्किंगची सुविधा मिळणार आहे. ही इमारत मुंबईतील वर्सोवा भागातील यारी रोडजवळ आहे.

“आम्ही कोणाच्या पोटी जन्मलो?” सरोगसीद्वारे जन्मलेली जुळी मुलं विचारतात प्रश्न; करण जोहर म्हणाला, “ही परिस्थिती…”

बॉलीवूड सेलिब्रिटी रिअल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत, हे गेल्या काही दिवसांत झालेल्या व्यवहारांवरून दिसून येत आहे. नुकतीच जावेद अख्तर यांनी जुहू परिसरात ७.७६ कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली आहे. आमिर खानने जूनमध्ये पाली हिल येथील बेला व्हिस्टा अपार्टमेंट या निवासी इमारतीत ९.७ कोटी रुपयांचे अपार्टमेंट खरेदी केले.

गरोदर असल्याने सोनाक्षी सिन्हाने केलं लग्न? अभिनेत्री प्रतिक्रिया देत म्हणाली, “आता बदल एवढाच…”

दीड महिन्यांपूर्वी अभिनेत्री तृप्ती डिमरीने १४ कोटी रुपयांमध्ये वांद्रे भागात दोन मजली घर विकत घेतलं. तृप्तीचा आलिशान बंगला कार्टर रोडजवळ आहे. या भागातच शाहरुख खान, सलमान खान, रेखा यांसारखे बॉलीवूड स्टार राहतात. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट देखील याच परिसरात राहतात. तर एप्रिलमध्ये अमिताभ बच्चन यांनी मुंबईच्या बोरिवलीमध्ये सात कोटी रुपयांना दोन अपार्टमेंट खरेदी केले. शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत कपूर यांनी वरळीतील ओबेरॉय ३६० वेस्ट प्रकल्पात अंदाजे ६० कोटी रुपयांची गुंतवणूक करून आलिशान सी-व्ह्यू अपार्टमेंट विकत घेतले.

गीतकार जावेद अख्तर यांनी मुंबईत राहत्या इमारतीत घेतलं आलिशान घर, किंमत तब्बल ‘इतके’ कोटी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘कसौटी जिंदगी की’, ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’, ‘बंदिनी’ अशा मालिकांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या रोनितने अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. तो शेवटचा टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमार यांच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’मध्ये दिसला होता.