सोनू सूद हा बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. हिंदीबरोबरच त्याने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही काम केलं आहे. लॉकडाऊन दरम्यान कामगारांना केलेल्या मदतीमुळे सोनू सूदला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. सध्या सोनू सूद हा ‘फतेह’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतंच या चित्रपटाच्या शूटींगचा एक व्हिडीओ त्याने पोस्ट केला आहे.

सोनू सूदने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत सोनू सूदचे काही चाहते हे त्याचे शूटींग पाहण्यासाठी थांबल्याचे दिसत आहेत. एका लहानशा गल्लीत या चित्रपटाचे शूटींग चालू असल्याचे दिसत आहे.

या व्हिडीओत सोनूचा या चित्रपटातील लूक कसा असणार आहे, हे देखील पाहायला मिळत आहे. या चित्रपटात सोनू सूदबरोबर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसही झळकणार आहे. सोनूने तिच्याबरोबरही या ठिकाणी काही दृश्य शूट केली आहेत. त्याचीही झलक या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

सध्या सोनू सूदचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे यावेळी सोनू हा शूटींगमधून वेळ काढून चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहे. यात अनेक अॅक्शन सीक्वेन्सही पाहायला मिळणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान झी स्टुडिओज आणि शक्ती सागर प्रॉडक्शनच्या सहकार्याने फतेह या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. वैभव मिश्रा हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. यात अभिनेता सोनू सूद आणि जॅकलीन फर्नांडिस हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.