अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. अभिनेत्रीने गेल्यावर्षी एका गोंडस मुलीला जन्म दिला. दोघांनी त्यांच्या मुलीच नाव राहा असं ठेवलं आहे. आलिया आणि रणबीर अनेकदा राहाबद्दल बोलत असतात. आलियाने नुकत्याच एका मुलाखतीतल राहा मोठी होऊन काय बनणार याबाबतचा खुलासा केला आहे.

हेही वाचा-“महिलांचा एवढा अपमान…” मणिपूर घटनेवर जया बच्चन संतापल्या, म्हणाल्या, “तो व्हिडीओ…”

भारताच्या इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनायटेड नेशन्स (IIMUN) बॅक टू स्कूल मालिकेसाठी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आलिया म्हणाली की राहाने वैज्ञानिक व्हावे अशी तिची इच्छा आहे. या कार्यक्रमात रणवीर सिंग आणि करण जोहर देखील उपस्थित होते. येथे त्यांनी सुमारे ५० हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधला. IIMUN मध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आलिया म्हणाली, “मी माझ्या मुलीकडे बघते आणि म्हणते ‘तू तर वैज्ञानिक बनणार.” सध्या आलियाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by ???? ????? ??? ????☀️ (@aliaabhatttt8)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातून करण जोहर सात वर्षांनंतर दिग्दर्शनात पुनरागमन करत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट्टची जोडी पुन्हा एकदा दिसणार आहे. याआधी या जोडीने ‘गली बॉय’मध्ये धुमाकूळ घातला आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ रोमँटिक ड्रामा आहे. या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्येही उत्सुकता आहे. ‘रॉकी हा चित्रपट २८ जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.