बॉलिवूड अभिनेत्री आणि सोशल एक्टिविस्ट सोमी अली नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. सोमी आपला एक्स बॉयफ्रेंड आणि बॉलिवूडचा भाईजान सलमान खानबद्दल बरीच वक्तव्य केल्यामुळे चर्चेत आली. सलमानने केलेला शारीरिक आणि मानसिक छळ याबद्दल ती उघडपणे बोलली. मात्र यावेळी तिने अभिनेत्री कंगना रणौतचे कौतुक केले आहे. सोमीच्या म्हणण्यानुसार की कंगना ही एकमेव अभिनेत्री आहे जी कधीच खोटं बोलत नाही.

एका मुलाखतीदरम्यान सोमी म्हणाली, “कंगना ही अशी एकमेव अभिनेत्री आहे जी अजिबात खोटं बोलत नाही. मी कायम तिच्यापुढे नतमस्तक होते. ती कायम खरं बोलते. तिच्याबाबाबतीत जे चुकीचं घडलं आहे त्याबद्दल ती निर्भीडपणे बोलते. मुलाखतीमध्ये ती अत्यंत शांत आणि संयम ठेवून बोलते अन् या चित्रपटसृष्टीतील राजकारणाविषयी, इथल्या खोटारड्या लोकांविषयी स्पष्टपणे मत मांडते. यामुळेच मला तिच्याबद्दल प्रचंड आदर वाटतो.”

आणखी वाचा : ‘गहराईयाँ’मधील दीपिकाच्या बोल्ड सीन्ससाठी अशी घेतलेली मेहनत; इंटीमसी को-ऑर्डिनेटर आस्था खन्नाचा खुलासा

सोमीचं हे वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं. यावर कंगनानेदेखील प्रतिक्रिया दिली. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर स्टोरीच्या माध्यमातून कंगना सोमीच्या स्टेटमेंटबद्दल लिहिते, “माझ्याकडे तुझ्यासारख्या कित्येकांची साथ आणि ताकद आहे ज्यांनी याआधी खूप सहन केलं आहे. माझ्याकडे तुमच्यासारख्यांचा आवाज आहे जो कधीच उठवला गेला नाही, असं सत्य आहे जे कधीच समोर आलं नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोमी शेवटची १९९७ च्या ‘चुप’ चित्रपटात दिसली होती, त्यानंतर तिने दक्षिण आशियातील महिलांच्या हक्कांसाठी सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिलं. २००६ मध्ये तिने ‘नो मोअर टीयर्स’ ही एनजीपी सुरू केली. ९० च्या दशकात अभिनेता सलमान खानबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्यामुळे सोमी तेव्हा चर्चेत होती.