अभिनेत्री बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोवर यांच्यासाठी खास ठरलं. करण आणि बिपाशाच्या घरी लग्नाच्या जवळपास ६ वर्षांनंतर मुलीचा जन्म झाला. लेकीच्या जन्मानंतर बिपाशाने चाहत्यांना तिच्या नावाची माहिती दिली होती. बिपाशाने लेकीचं नाव ‘देवी’ असं ठेवलं. अभिनेत्रीनं ठेवलेल्या मुलीच्या नावावर चाहते खूप खूश आहेत.

बिपाशाने मागे चाहत्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिच्या लेकीची पहिली झलक दाखवली होती. मात्र आता तिने आपल्या लेकीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिचा पती करण सिंह ग्रोवरदेखील दिसत आहे. या फोटोत वडील आणि मुलगी दोघे आराम करताना दिसत आहेत. ‘हे खरं प्रेम, माझे हृदय’ असा कॅप्शन तिने दिला आहे.

“तर मी…” ऐतिहासिक चित्रपटातील भूमिकांविषयी अक्षय कुमारने दिलं होतं स्पष्टीकरण

बिपाशाने शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेकजण तिला शुभेच्छा देत आहेत. एकाने ‘खूप सुंदर’ अशी कमेंट केली आहे. ‘देवाची कृपा राहो’ अशी एकाने कमेंट केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोवर यांनी ३० एप्रिल २०१६ रोजी लग्न केलं होतं. १२ नोव्हेंबरला आई-बाबा झाल्यानंतर बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोवर यांनी मुलीच्या जन्माची माहिती देतानाच तिच्या नावाचा खुलासाही केली होता. दोघंही मुलीच्या जन्मानंतर खूप खूश आहेत.