दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी नव्या ऐतिहासिक मराठी चित्रपटाची नुकतीच घोषणा केली होती. या चित्रपटात अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. नुकताच त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमधील लूक शेअर केला आहे. अक्षयने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकमध्ये अक्षय चालत येताना दिसत आहे. या व्हिडीओमधये अक्षयची चाल, भेदक नजर विशेष लक्ष वेधून घेत आहे. अक्षयने याआधीदेखील ऐतिहासिक भूमिका साकारली आहे.

अक्षय कुमार बॉलिवूडचा सर्वात महागडा अभिनेता मानला जातो. नुकताच त्याचा ‘रामसेतू’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यावर्षी त्याचा बहुचर्चित चित्रपट सम्राट पृथ्वीराज हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यशराज फिल्म्सची निर्मिती असलेला हा चित्रपट बिग बजेट होता. मात्र बॉक्स ऑफिसवर तो आपटला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी एका मुलाखतीत सांगितले की, “जर चित्रपट फ्लॉप झाला तर निर्माता निराश होतो. यश राजसारखी संस्था पहिल्यांदा अशा प्रकारच्या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती करत आहे जर हा चित्रपट फ्लॉप झाला तर ते पुन्हा एकदा व्यवसायिक चित्रपट बनवतील. ते पुढे म्हणाले की अक्षय कुमार मला म्हणाला होता जर हा चित्रपट फ्लॉप झाला तर मी पुन्हा एकदा व्यावसायिक चित्रपटांकडे वळेन, कारण ते चित्रपट जास्त कमवतात. अक्षयने हे इतर मुलाखतींमध्ये सांगितले आहे.” नवभारत टाईम्सशी बोलताना ते असं म्हणाले होते.

KGF चे निर्माते शाहरुख खानला घेऊन करणार चित्रपट; रिषभ शेट्टी दिसणार ‘या’ भूमिकेत

एकीकडे ‘हेरा फेरी ३’मध्ये अक्षय दिसणार नसल्याने चाहते नाराज आहेत. तर दुसरीकडे ‘हेरा फेरी ३’ पाठोपाठ आणखी ३ चित्रपटातून त्याचा पत्ता कट झाला असल्याचं समोर आलं आहे. ‘ओह माय गॉड’ चित्रपटाचा दुसरा भाग पुढील वर्षी प्रदर्शित होत आहे. यात पुन्हा एकदा अक्षय कुमार परेश रावल ही जोडी दिसणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘वेडात मराठी वीर दौडले सात’ हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची कथा पराग कुलकर्णी यांची असून पटकथा महेश मांजरेकर, पराग कुलकर्णी यांची आहे, तर संवाद संजय पवार यांनी लिहिले आहेत. या चित्रपटात दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे प्रतापराव गुजर यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत.